प्रजाराज्य न्यूज;हेडलाईन्स!

बुधवार, 7 एप्रिल 2021
▶️ नववी आणि अकरावीच्या विद्यार्थ्यांनाही पुढील वर्गात प्रवेश दिला जाणार आहे. नववी आणि अकरावीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा न घेण्याचा निर्णय शिक्षण विभागाचा निर्णय!
▶️ देशात गेल्या 24 तासांत 1.15 लाखहून अधिक रुग्ण, 630 हून अधिक रुग्णांचा मृत्यू.
▶️ राज्याच्या कानाकाेपऱ्यात अडीच महिन्यांत पोहोचवली 80 लाख जणांना काेराेना लस.
▶️ कारमध्ये तुम्ही जरी एकट्याने प्रवास करत असाल तरी देखील मास्क वापरणे अनिवार्य; यासंदर्भात दाखल एका याचिकेवर सुनावणी करताना दिल्ली हायकोर्टाचा निर्णय
▶️ मुंबई पोलीस आणि उत्पादन शुल्क विभागानं संयुक्त आदेश देत मुंबईतील दारूची दुकानं बंद करण्याचा घेतला निर्णय; या आदेशांनंतर दारुची होम डिलीव्हरीही नाकारण्यात येणार.
▶️ मल्टी कमोडिटी एक्सचेंजनुसार, 10 ग्रॅम सोन्याचा भाव 45,804 रुपयांपर्यंत पोहोचला, प्रतिकिलो चांदीचा भाव 65,748 रुपयांवर
▶️ 20 ते 40 या वयोगटातील तरुण वर्ग मोठ्या संख्येनं बाहेर फिरतो. 20 ते 40 वर्षाच्या वयोगटात संसर्गाचं प्रमाण जास्त, त्यामुळं आता वय वर्ष 18 च्या पुढे महाराष्ट्रात सर्वांनाच लसीकरण करण्याची अनुमती द्या, केंद्राकडे राजेश टोपेंची मागणी.
▶️ परमबीर सिंह NIA च्या कार्यालयात चौकशीसाठी पोहोचले, वाझेच्या सीक्रेट पार्टनरची सीक्रेट डायरी मिळाली; जिलेटिनने भरलेली स्कॉर्पिओच्या जप्तीनंतर, परमबीर सिंह यांनीच हा तपास केला वाझेंच्या स्वाधीन
▶️ हिमालयात ब्लॅक कार्बनच्या प्रमाणात वाढ;उत्तराखंडातील जंगलातील आगीवर वाडिया भूविज्ञान संस्थेचे संशोधन, हिमरेषा घटतेय, जीवजंतू व वनस्पतींवर होईल थेट परिणाम
▶️ रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची मॉनेटरी पॉलिसीमध्ये रेपो रेटला 4 टक्क्यांवरच स्थिर ठेवलं गेलं; रिव्हर्स रेपो रेटमध्ये बदल नाही, तो आहे तसाच जोपर्यंत आवश्यक असेल तोपर्यंत 3.5 टक्क्यांवर राहणार,
▶️ चाळीसगाव- गिरणा धरणातून पाण्याचे आवर्तन सोडले;धरणात सध्या 47.66 टक्के पाणीसाठा शिल्लक.