ऑनलाईन व्यवहार संबंधी नियमांत बदल; रिझर्व्ह बँकेचा नवा नियम

मुंबई (वृत्तसंस्था) इंटरनेट बँकिंगद्वारे पैशांचे व्यवहार करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. रिझर्व्ह बँकेने आता ‘आयएमपीएस’द्वारे (Immediate Payment Service) केल्या जाणाऱ्या व्यवहारांची मर्यादा वाढविण्याचा निर्णय घेतला आहे.
नागरिकांना सध्या दिवसाला 2 लाख रुपयांपर्यंत ऑनलाईन व्यवहार करता येत होते. मात्र, आता त्याची मर्यादा 5 लाख रुपयांपर्यंत वाढविली आहे. शिवाय आरटीजीएस (RTGS) व्यवहार 24×7 करता येणार आहेत. ग्राहकांच्या सोयीसाठी रिझर्व्ह बॅंकेने हा निर्णय घेतला आहे.
▶️ ‘आरटीजीएस’द्वारे एका वेळी 2 लाख रुपयांपेक्षा कमी रक्कम हस्तांतरित केली जाऊ शकत नाही. जास्तीत जास्त रकमेची मर्यादा वेगवेगळ्या बँकांनुसार भिन्न आहे.
‘एनईएफटी’द्वारे (NEFT) पैसे हस्तांतरित करण्यासाठी किमान मर्यादा नाही; मात्र जास्तीत जास्त पैसे पाठवण्याची मर्यादा प्रत्येक बँकेनुसार वेगवेगळी आहे. ‘एनईएफटी’शिवाय ‘आरटीजीएस’ आणि ‘आयएमपीएस’द्वारे पैसे हस्तांतरित करता येतील.
▶️ व्याजवर कायम राहणार
दरम्यान, रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण आढावा समितीची (एमपीसी) बैठक नुकतीच झाली. रिझर्व्ह बॅंकेने रेपो रेट (4 टक्के), तर रिव्हर्स रेपो रेट (3.35 टक्के) ‘जैसे थे’ ठेवल्याची माहिती ‘आरबीआय’चे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी दिली.