खाद्यतेल होणार स्वस्त;आयात शुल्क होणार कमी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) तेलाचे दर नियंत्रणात ठेवण्यासाठी केंद्र सरकार कडधान्यांप्रमाणे तेलबियांचा साठा देखील तपासणार आहे.
केंद्र सरकारने आणखी एक मोठा निर्णय घेतला आहे त्यानुसार खाद्यतेलांवरील आयात शुल्क 5.5 टक्क्यांनी कमी करण्यात येणार आहे, असे केंद्र सरकारने सांगितले
▶️ किती कमी होणार आयात शुल्क
▪️ केंद्र सरकारच्या निर्णयानुसार – क्रूड पाम तेलावरील आयात शुल्क 30.25 वरून कमी करून 24.75 टक्के करण्यात आले आहे
▪️क्रूड Degummed सोयाबीन तेलावरील आयात शुल्क 30.25 वरून 24.75 टक्के करण्यात आले आहे
▪️ क्रूड सन फ्लावर तेलावरील आयात शुल्क 30.25 वरून 24.75 टक्के करण्यात आले आहे
▪️आरबीपी पाम ओलीन तेलावरील आयात शुल्क 41.25 टक्क्यांवरुन 35.75 टक्के करण्यात आले आहे
▪️ तसेच रिफाइंड सोयाबीन तेलावरील आयात शुल्क 41.25 टक्क्यांवरुन 35.75 टक्के करण्यात आले आहे