प्रेरणादायी: पंक्चर काढणारा झाला आयएएस अधिकारी!

आयुष्यामध्ये अनेक कठीण प्रसंग येत असतात, पण एका मुलापुढे आपल्या आयुष्यात येतात त्यापेक्षा खूप कठीण प्रसंग आले होते पण मित्रांनो त्या मुलाने कधी हार नाही मानली. प्रत्येक प्रसंगापुढे तो दंड थोपटून उभा राहिला परिणाम असा झाला की त्याच्या आयुष्यातल्या प्रत्येक गोष्टीचे त्याच्याकडे उत्तर आहे आणि हेच प्रत्येक प्रसंगापुढे दंड थोपटून त्याला सामोरे जाण्याच्या त्याच्या मानसिकतेने त्याला भारतामधली सर्वात कठीण परीक्षा उत्तीर्ण केले आहे. आज तो आयएएस अधिकारी बनलेला आहे.
या मुलाचे नाव आहे वरुण बनरवाल, एका गरीब महाराष्ट्रीय कुटुंबामधील हा मुलगा एकेकाळी बोईसर येथे सायकल पंक्चर काढायचा. वरुण लहानपनापासून हुशार पण गरीबी त्याच्या पाचवीला पूजलेली. त्याच्या वडिलांचे सायकल पंक्चर काढण्याचे दुकान होते. दिवसा ज्या काही सायकली पंक्चर काढायला येतील त्यावरून त्यांचे घर चालायचे. इतकी गरीबी असणारे अनेक कुटुंबामधील मुले खूप लवकर शाळा सोडून काम करायला घेतात पण वरुणच्या वडिलांना हे मान्य नवते. शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे हे अशाच आई वडिलांमुळे जगाला कळते.
जेव्हा वरुण दहावीला होता तेव्हा त्याचे वडील आजारी पडले. वरुणने सर्वांनी काळजी घेतली, वडिलांचा दवाखाना केला आणि दहावीची बोर्डाची परीक्षादेखील दिली. दहावीची परीक्षा संपली आणि सोबत त्याच्या वडिलांची प्राणज्योत देखील मालवली. वरुण आता घरातला कर्ता पुरुष होता. घर चालवण्याची सगळी जबाबदारी त्याच्यावर होती आणि वरुण ने काम करायला सुरवात देखील केली. दहावीचा निकाल लागला, संपूर्ण शहारामध्ये वरुण दूसरा होता ! आईच्या डोळ्यात पानी होते आणि आईने निर्णय घेतला वरुणला खूप शिकवण्याचा. तिने त्याला स्पष्ट संगितले तू शिक मी दुकान चाळवेल.
कुटुंबातला प्रत्येक जन काही ना काही काम करत होता. लहान भावंडांना आपला भाऊ मोठा झालेलेला पाहायचा होता. पुढे शिकायचे होते पण पुढच्या शिक्षणाचा खर्च डोईजड होत होता, दहा हजार रुपये फी होती. वरुण निराश झाला पण त्याने हार मानली नाही. सकाळी तो शाळेमध्ये जायचा, घरी आला की काही शिकवण्या घायचा आणि मग दुकानावर येऊन काम देखील करायचा. तीन तीन गोष्टी सांभाळत त्याला क्षणाची उसंत देखील नवती. दुकानात काम करता करता त्याला रात्री 10-11 वाजायचे. तेव्हा तो काम करतानाच अभ्यासाची पुस्तकेदेखील वाचायचा. वरुण 12 वी पास झाला. त्याचा ओढा इंजिनियरिंग कडे होता. यावेळी मात्र अनेक आप्तेष्ठ धावून आले आणि पुण्याच्या एमआयटी कॉलेज पुणे येथे त्याला प्रवेश मिळाला.
E&TC मध्ये वरुणने प्रवेश घेतला, पहिल्या वर्षाची फी भरण्यासाठी त्याला त्याची वडीलोपार्जित असणारी थोडीशीच जमीन विकावी लागली. टर्म परीक्षेमध्ये तो कॉलेजमध्ये पहिलं आला होता. शिकता शिकता तो शिकवणी देखील घेत असे. अनेक मित्रांनी आणि शिक्षकांनी त्याला फी भरायला मदत केली. शिक्षण पूर्ण झाले आणि त्याला एका बहुराष्ट्रीय कंपनीची ऑफर देखील मिळाली. पण खासगी नोकरी केली तर आपण समाजाला काय देणार असा प्रश्न त्याला होता. त्याने यूपीएससी द्यायचा निर्णय घेतला. या निर्णयाने आई खूप चिडली.. अनेक दिवस बोलली देखील नाही. अवघ्या दोन वर्षाच्या तयारीने वरुण ने संपूर्ण भारतामध्ये 32 वा नंबर मिळवत आयएएस ची पोस्ट काढली. त्याच्याकडे पुस्तके घेण्याइतके देखील पैसे नवते, एका स्वयंसेवी संघटनेच्या मदतीने त्याला पुस्तके मिळाली होती.
वरुण जेव्हा आयएएस बनला तेव्हा त्याचे वय होते 23 वर्षे. वरुणचा हा प्रवास खूप प्रेरणादायक आहे. एका गरीब… अत्यंत गरीब परिवारामधून आलेला मुलगा लाखोची नोकरी नाकारतो यावरून त्याचा स्वत:वरील आत्मविश्वास दिसून येतो. आपण आज काय आहोत हे माहिती असून आपल्या पंखांना न कातरता आणि ती गोष्ट आपल्या स्वप्नांच्या मध्ये येऊन न देता गरुडाची झेप कशी घ्यायची हे वरुण आपल्याला दाखवून देतो. त्याच्या जिद्दीला सलाम.