आता गुगल-पे वर करता येणार एफ. डी.

मुंबई (वृत्तसंस्था) गुगल-पे ने आपल्या ग्राहकांसाठी फिक्स डिपॉझिट सुविधा सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे . यासाठी कंपनीने आर्थिक बँकेसोबत भागीदारी केली आहे
त्यामुळे नागरिकांना आता स्वतंत्रपणे बँकेत खाते सुरु करण्याऐवजी थेट गुगल पे अॅपच्या माध्यमातून एफडी सुरु करता येईल
▶️ अशी करता येईल FD
▪️ गुगल पे वर एफडी बुक करण्यासाठी आपल्याला बिझनेस अँड बिल्स सेक्शन मध्ये इक्विटास स्मॉल फायनान्स बँक सर्च करा
▪️त्यानंतर KYC कंप्लिट करा -नंतर गुगल पे च्या UPI चा वापर करुन FD साठी पेमेंट करा.
एफडी सुरु केल्यानंतर आपल्याला गुगल पेवर ती ट्रॅक करता येणार आहे तसेच मॅच्युरिटी रक्कम आपोआप गुगल पेला लिंक केलेल्या बँक खात्यात जमा होईल
▪️ या व्यतिरिक्त ट्रँकिंग पेजवर वेळेपूर्वीच एफडी मोडण्यासाठी आपल्याला अर्ज सुद्धा करता येणार आहे असे कंपनीने सांगितले.