1 ऑक्टोबरपासून कामाच्या वेळेत होतील बदल!

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) वरिष्ठांनी दिलेल्या माहितीप्रमाणे देशात 1 ऑक्टोबरपासून नव्या कामगार नियमांची अंमलबजावणी होण्याची शक्यता आहे.
तसे पाहिले तर केंद्र सरकारला 1 एप्रिलपासून या नियमांची अंमलबजावणी करायची होती.मात्र, अनेक कंपन्यांनी एचआर पॉलिसीतील बदलांसाठी अधिक वेळ लागेल, असे सांगून मुदत वाढवून घेतली होते.
▶️ यामुळे काय बदल होतील ?
नव्या कामगार कायद्यामध्ये अनेक तरतुदी आहे जसे एखाद्या कर्मचाऱ्याने आता 15 ते 30 मिनिटं जास्त काम केले तरी त्याला सरसकट अर्ध्या तासाचा ओव्हरटाईम मिळेल.
कोणत्याही कर्मचाऱ्यांना सलग पाच तासांपेक्षा अधिक काम करण्यास मनाई आहे – म्हणजे दर पाच तासांनी कर्मचाऱ्यांना अर्ध्या तासाच ब्रेक बंधनकारक असेल
तसेच नव्या नियमांनुसार कर्मचाऱ्यांनी बेसिक सॅलरी एकूण वेतनाच्या 50 टक्के असेल – आता बेसिक सॅलरी वाढल्यामुळे कर्मचाऱ्यांचा पीएफ मध्ये आणखी वाढेल
या कायद्यामध्ये अनेक तरतुदी आहेत 1ऑक्टोबरपासून याची अंमलबजावणी होणार आहे.