सर्वात स्वस्त ‘जिओ फोन नेक्स्ट’ 10 सप्टेंबरला लाॅंच होणार,वाचा वैशिष्ट्ये!

मुंबई (वृत्तसंस्था) रिलायन्स समुहाचा गुगल बॅक्ड स्मार्टफोन ‘जिओफोन नेक्स्ट’ येत्या 10 सप्टेंबरला लाॅंच होणार आहे. बहुतेक स्मार्टफोनपेक्षा हा स्मार्टफोन स्वस्त असेल, असा दावा करण्यात येत आहे.
पुढील 6 महिन्यांत 50 मिलियन युनिट्सची विक्री करून 10,000 कोटीपर्यंत व्यवसाय करण्याचे रिलायन्सचे उद्दिष्ट आहे. त्यासाठी स्टेट बँक ऑफ इंडिया, पिरामल कॅपिटल, आयडीएफसी फर्स्ट अॅश्योर, डीएमआय फायनान्स यांच्यासोबत रिलायन्स कंपनी कोलाबोरेट करू शकते.
जिओफोन नेक्स्टच्या बेसिक माॅडेलची किंमत 5000 रुपये, तर जिओफोन नेक्स्ट अॅडव्हान्सची किंमत 7000 रुपये असेल. मात्र, ग्राहकांना संपूर्ण पैसे द्यावे लागणार नाहीत, तर केवळ 10 टक्के म्हणजेच 500 रुपये देऊन फोन खरेदी करू शकता. उरलेले पैसे बँका देतील. म्हणजेच तुम्हाला हा फोन हप्त्यांत घेता येणार आहे.
▶️ ‘जिओ फोन नेक्स्ट’ची वैशिष्ट्ये
▪️ गुगल अँड्रॉइड गो ऑपरेटिंग सिस्टिम दिली जाईल, जी अँड्रॉइड-11 वर आधारित असेल.
▪️ फोनमध्ये 2 जीबीपेक्षा कमी रॅम असेल
▪️ स्टोअरेजमध्ये 32 जीबी व 64 जीबी पर्याय असतील.
▪️ मायक्रो एसडी कार्ड स्लॉटचा पर्याय असेल.
▪️ 5.5 इंच आणि 6 इंच डिस्प्ले दिला जाऊ शकतो.
▪️ बॅटरी 3000 ते 4000mAh च्या दरम्यान असेल
▪️ ड्युअल सिम सपोर्ट