ऑनलाईन शॉपिंग पेमेंटमध्ये आरबीआय ने केला बदल!

नवी दिल्ली (वृत्तसंस्था)रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने ग्राहकांना ऑनलाईन फ्रॉडपासून वाचवण्यासाठी डेटा सिक्योरिटीच्या नियमामध्ये काही बदल केले आहेत
आता ऑनलाईन शॉपिंगवेळी कार्डसंबंधी एक टोकन नंबर दिला जाणार हा नंबर प्रत्येक ई-कॉमर्ससाठी वेगळा असेल असे RBI ने सांगितले .
RBI ने दिलेल्या माहितीनुसार आता शॉपिंगवेळी ई-कॉमर्स व्यापारी आणि पेमेंट प्रोव्हायडरमध्ये टोकन दिले जाईल. या टोकनचा इतर कोणत्याही ठिकाणी वापर करता येणार नाही यामुळे फ्रॉडची शक्यता कमी होईल.
या टोकन आयडीद्वारे ग्राहकांना आपले सर्व डिटेल्स न देता पेमेंट करता येईल तसेच 1 ऑक्टोबरपासून डेबिट कार्ड आणि क्रेडिट कार्डच्या ऑटो डेबिटवर अॅडिशनल फॅक्टर ऑथेंटिकेशनचे नियम लागू होतील
यामध्ये वेगवेगळ्या पेमेंटसाठी ग्राहकाची मंजूरी घ्यावी लागेल. म्हणजेच सर्व ऑटो डेबिट पेमेंट बंद होतील. याचबरोबर 1 जानेवारी 2022 पासून डेबिट कार्ड किंवा क्रेडिट कार्डवरुन पेमेंट करताना कार्डचा 16 डिजीट नंबर ऑनलाईन वेबसाईटला द्यावा लागेल कारण ई-कॉमर्स कंपन्या आता डेटा स्टोर करू शकणार नाहीत असे RBI ने सांगितले.