अमळनेर भारतीय जनता पार्टी तर्फे शंखनाद आंदोलन!

अमळनेर (प्रतिनिधी) ठाकरे सरकारने पाच महिन्यांपासून राज्यातील सर्व धार्मिक स्थळे पुन्हा बंद करून ठेवली आहेत. आता सर्व व्यवहार सुरळित केले असताना फक्त मंदिरे बंद ठेवण्यात आली आहेत. मंदिरांवर अवलंबून असलेल्या लाखो लोकांच्या उपजीवीकेवर गदा आल्याने त्यांची उपासमार होते आहे. त्यांना राज्य सरकार कोणतीही आर्थिक मदत देत नाही आणि मंदिरे देखील उघडली जात नाहीत. देशातल्या अन्य राज्यात मात्र मंदिरे सुरु आहेत. म्हणुनच देव-धर्मावर सातत्याने अन्याय करणाऱ्या, देवी-देवतांना बंदिस्त करून लाखो गरीबांची उपासमार करणाऱ्या ठाकरे सरकारला मंदिरे खुली करण्याचा इशारा देण्यासाठी श्रीकृष्णजयंती आणि चौथ्या श्रावण सोमवारच्या पवित्र मुहूर्तावर भारतीय जनता पार्टी अमळनेर व आध्यात्मिक समन्वय आघाडी तर्फे माजी आमदार स्मिताताई वाघ यांच्या नेतृत्वाखाली विजय मारुती मंदिर येथे शंखनाद आंदोलन करण्यात आले.यावेळी तालुकाध्यक्ष हिरालाल पाटील,युवा मोर्चा प्रदेश सचिव भैरवी वाघ पलांडे,प्र.युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष राकेश पाटील,सरचिटणीस जिजाब पाटील,राहुल पाटील,विजय राजपूत,देवा लांडगे,महेश पाटील,दिलीप ठाकूर,अध्यात्मिक आघाडी महेश महाराज,प्रकाश पाटील,युवा मोर्चा ता सरचिटणीस रवि पाटील,विलास सूर्यवंशी, राहुल चौधरी,समाधान पाटील,हिरालाल पाटील,योगीराज चव्हाण,मिलिंद पाटील,रवि ठाकूर,सौरभ पाटील,निखिल पाटील,जयदीप पाटील,निनाद जोशी आदी उपस्थित होते.