आ.चिमणराव पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त राज्यस्तरीय खुली बुद्धीबळ स्पर्धा संपन्न!

▶️ स्पर्धेत ३३ अंतरराष्ट्रीय फिडे मानांकीत खेळाडूंसह १२१ स्पर्धकांचा सहभाग
पारोळा (प्रतिनिधी) कै.तात्यासाहेब रू. फ. पाटील शि. मंडळ देवगांव व पारोळा तालुका चेस असोशीयशन यांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित राज्यस्तरीय खुली बुद्धीबळ स्पर्धा आमदार चिमणराव पाटील यांच्या वाढदिवसाच्या निमित्त आयोजीत केली होती. स्पर्धेत ३३ अंतरराष्ट्रीय फिडे मानांकीत खेळाडूंसह १२१ स्पर्धकांनी सहभाग नोंदवून स्पर्धा यशस्वी केली .
कार्यक्रमाचे उद्घाटन माजी नगराध्यक्षा नलीनीताई पाटील यांनी दिपप्रज्वलन करून केले तर बुद्धीबळ पटावर चाल करून बाजार समितीचे सभापती अमोल पाटील व अंतरराष्ट्रीय फिडे मानांकित डॉ. संजनाराजे जाधव यांनी केले. यावेळी मृणालताई पाटील, सुनिल चौधरी धूळे जिल्हा बुद्धीबळ संघटना सचिव सूनिल चौधरी ,पारोळा तालुका व जळगाव जिल्हा चेस असोशियन चे पदाधिकारी , बाजार समितीचे सचिव चौधरी,अवींत पाटील,नितीन पाटील , रविंद्र सोनार,ॲड.अशोक पाटील व मुख्याध्यापक आर.एम.पाटील, डि.बी.नावरकर,पी.जी.पाटील,आर. यु.मोरे,सौ.स्मिता पाटील, एस.बी. गोसावी,संदिप पाटील,प्रविण बिरारी,विलास पाटील,बोरसे सर व कै. रु. फ. पाटील शिक्षण मंडळ देवगाव चे शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते .स्पर्धे दरम्यान आमदार चिमणराव पाटील यांचा वाढदिवस केक कापून साजरा केला.सर्व खेळाडू व उपस्थितांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्यात.
सदर स्पर्धेत खालील विवीध गटात विजयी स्पर्धकांना रोख रक्कम , ट्राकी व प्रमाणपत्र बक्षीस देऊन गौरवण्यात आले.

▶️ प्रथम दहा खुले बक्षिसाचे मानकरी
प्रथम पाटिल मयुर – शहादा ,
व्दितीय देवांग कल्पेश नंदुरबार ,
तृतीय अहिरे विशाल शहादा ,
४) चौधरी महेश धरणगाव ,
५) नाईक देविदास कल्याण
६) तायडे विवेक जळगाव ,
७) सोनार रुषीकेश – नंदुरबार
८) गुणवंत कासार, जळगाव
९) कासार प्रशांत – जळगाव
१०) केसावलकर राहूल – जळगाव
▶️ नऊ वर्षा खालील बक्षिस विजेते
१) पाटिल अजय – जळगाव
२) पाटिल अद्वेत – शिरपूर
३) मुनोद नैतिक – जळगाव
▶️ सतरा वर्षा आतील बक्षिस विजेते
१) जेठवा मितेश – अमळनेर
२) पाटिल वैभव – पाचोरा
३) सोनवणे विनय – जामनेर
▶️ साठ वर्षा वरील वर्षांवरील विजेते स्पर्धक
१) चंद्रशेखर देशमुख – जळगाव
२) बोरकर संजय – मुंबई
३) सोमवंशी नथ्यू – जळगाव
▶️ महिला खेळाडू बक्षीस विजेते
१) कोकने खुशबू – धुळे
२) काबरा श्रृती – जळगाव
३) संगवी रिद्धी – पाचोरा
▶️ पारोळा स्पेशल बक्षीस विजेते
१) डॉ. अविंत पाटील
२) खर्चे किरण
३) पाटील निखिल
▶️ उत्तेजनार्थ बक्षिस विजेते
१. टि. आर. एफ. फॅमिली देवगाव- कार्तिक पाटील विटनेर
२. सर्वात लहान खेळाडू – राहूल पवार लोणी वय ३वर्ष,
लोकेश किशोर पवार ५ वर्ष काजीपूरा ता. चोपडा
३. सर्वात ज्येष्ठ – मधुकर रानडे ८३ वर्ष वय
स्पर्धेचे संचलन प्रविण ठाकरे सर , परेश देशपांडे , भारत आमले , अभिषेक जाधव , वेदांतराजे जाधव यांनी केले .
विजयी स्पर्धकांना आमदार चिमणरावजी पाटील, माजी नगराध्यक्षा नलिनी पाटिल,कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अमोल पाटील व मृणालताई पाटील यांच्या हस्ते बक्षिस वितरण करण्यात आले.यावेळी शिवसेना तालुका प्रमुख आर.बी.पाटील,मधूकर पाटील ,तालुका बुद्धीबळ संघटनेचे अध्यक्ष गणेश जाधव ,प्रा.डी.बी. पाटील, विश्वास पाटील,दिपक गिरासे,राजू कासार,दिलीप बबन पा. व भटेसींग गिरासे हे उपस्थित होते.
