धनदाई महाविद्यालयाचे खेडी येथे श्रमानुभव शिबिराचे उद्घाटन संपन्न.

अमळनेर (प्रतिनिधी) येथील धनदाई कला व विज्ञान महाविद्यालय अमळनेरच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे विशेष श्रमानुभव शिबिर खेडी खुर्द या गावी दिनांक 15 मार्च 2022 रोजी उद्घाटन संपन्न झाले. भारतीय सैन्य दलात सेवा बजावले व कारगिल युद्धात सहभाग असलेले खेडी गावातील माजी सैनिक नितीन दिलीप पाटील हे या कार्यक्रमाचे उद्घाटक होते तर धनदाई माता एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष डी. डी. पाटील हे या कार्यक्रमाचे अध्यक्ष होते तर प्रमुख अतिथी म्हणून गावच्या सरपंच आशाबाई ज्ञानदेव पाटील, उपसरपंच मंगलाबाई ज्ञानेश्वर पाटील, ग्रामपंचायत सदस्य ज्ञानदेव देवराव पाटील, ग्रामसेवक विजय पाटील जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक पंडित आनंदा सोनगिरे आदी मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित होते
शिबिराचे प्रास्ताविक राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी डॉ राहुल देविदास इंगळे यांनी केले. त्यानंतर प्राचार्य डॉ. प्रमोद पवार यांनी खेडी गावात लाभलेल्या सहकार्याचा उल्लेख करून या वर्षीही विद्यार्थ्यांनी गावात स्वच्छता व समाजपोयगी कार्य करावे अशी अपेक्षा व्यक्त जेली. कार्यक्रमाचे अध्यक्ष डी डी पाटील सर यांनी शिबिरात जीवनानुभव घेण्याचे आवाहन केले. सूत्रसंचालन महिला कार्यक्रम अधिकारी प्रा प्रवीण पवार यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रा कैलास पाटील यांनी केले. शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी उपप्राचार्य किशोर पाटील, डॉ. जयवंतराव पाटील, आय. क्यू. ए. सी. प्रमुख प्रा. लीलाधर पाटील, महिला कार्यक्रम अधिकारी प्रा. मीनाक्षी इंगोले यासह महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, प्राध्यापिका, शिक्षकेतर कर्मचारी, गावातील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते. या शिबिरात एन एस एस चे 85 स्वयंसेवक सहभागी झाले असून दि. 21 मार्च रोजी शिबिराचा समारोप होणार आहे.