श्री छत्रपती मराठा समाज नागरी सहकारी पतसंस्थेची निवडणूक बिनविरोध

चेअरमनपदी श्रीकृष्ण पवार तर व्हा.चेअरमनपदी अँड श्रावण ब्रह्मे
अमळनेर (प्रतिनिधी) येथील श्री छत्रपती मराठा समाज नागरी सहकारी पतसंस्थेची निवडणूक बिनविरोध पार पडून चेअरमनपदी श्रीकृष्ण विश्वनाथ पवार तर व्हा चेअरमन पदी अँड श्रावण सदा ब्रह्मे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
2022 ते 2027 या कालावधीसाठी ही निवडणूक 3 मार्च रोजी पार पडली होती,या निवडणुकीत 11 संचालक बिनविरोध विजयी झालेत, यात सर्वसाधारण जनरल प्रवर्गातून देशमुख जितेंद्र प्रभाकर(अमळनेर),पवार श्रीकृष्ण विश्वनाथ(अमळनेर),पाटील जिजाबराव आसाराम(वाघोदे),पाटील राजेंद्र संतोष(एकरुखी),पाटील संजय भिला(पैलाड),साळुंखे गजेंद्र दत्तात्रय(अमळनेर),तसेच महिला प्रवर्गातून पाटील स्वाती चेतन(वाघोदे),पाटील सुवर्णा हेमंत(अमळनेर),इतर मागासवर्गीय मधून पाटील बंडू लक्ष्मण(सोनखेडी),अनु जाती/जमाती ब्रह्मे श्रावण सदा(हेडावे),विजाभज मधून गढरे जगदीश दंगल(मंगरूळ) आदी संचालकांचा समावेश आहे.
निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून एस. पी. महाजन यांनी कामकाज पाहिले.दरम्यान बिनविरोध निवडून आणलेल्या संचालकांमधून वरील दोघांची चेअरमन व व्हा चेअरमन पदी निवड करण्यात आली,यावेळी सर्वांनी त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला.