20 रोजी आ.चिमणराव पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य राज्यस्तरीय बुद्धिबळ स्पर्धा!

पारोळा (प्रतिनिधी) पारोळा व एरंडोल मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार चिमणराव पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त 20 मार्च रोजी पारोळा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती तथा जेडीसीसी बँक संचालक अमोल पाटील यांच्या मार्गदर्शनाने पारोळा तालुका बुद्धिबळ संघटना व कै. तात्यासो.रू.फ.पाटील शिक्षण मंडळ, देवगाव यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य राज्यस्तरिय बुद्धिबळ स्पर्धा आयोजित केली आहे.
या स्पर्धेत एकूण 25 हजाराचे बक्षीसे चषक व प्रमाणपत्र आहेत. खुल्या गटासाठी एकूण 10 बक्षीस जाहीर केले असून 9 वर्षावरील गट व 17 वर्षावरील गटाला प्रत्येकी 3 बक्षीस तसेच खुला महिला गट, पारोळा तालुका खेळाडू व 60 वर्षावरील खेळाडू यांनाही विशेष बक्षीस जाहीर केले आहे व प्रत्येकी सहभागी खेळाडूला प्रमाणपत्र मिळणारआहे.
या स्पर्धेचं उद्घाटन हरिनाथ मंगल कार्यालय, कृषी उत्पन्न बाजार समिती पारोळा येथे 20 मार्च 2022 रोजी आमदार चिमणराव पाटील यांच्या हस्ते सकाळी 9 वाजता उद्घाटन होणार आहे.
तरी या स्पर्धेसाठी पारोळा एरंडोल जळगाव तसेच इतर जिल्ह्यातील ज्या इच्छुक खेळाडूंना सहभाग घ्यायचा असेल, त्यांनी गणेश जाधव,सर(मो.7709774646) प्रा. डॉ.अविंत पाटील,(मो.9284015110) गोविंद टोळकर,सर(मो.9421539698 यांच्याशी संपर्क साधावा या स्पर्धेसाठी फक्त 200 रु. प्रवेश फी आहे.
या स्पर्धेसाठी एरंडोल व धरणगाव गटशिक्षणाधिकारी विश्वास पाटील जुनी पेन्शन संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष दिपक गिरासे, जळगाव जिल्हा बुद्धिबळ संघटना यांचे अनमोल सहकार्य आहे.खेडाळूनीं जास्तीत जास्त संख्येने सहभाग नोंदवून स्पर्धेचा लाभ घ्यावा असे पारोळा तालुका बुद्धीबळ संघटनेचे अध्यक्ष गणेश जाधव यांनी आवाहन आहे.
