माजी केंद्रीय मंत्री विजय नवल पाटील यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा

0

अमळनेर (प्रतिनिधी) माजी केंद्रीय मंत्री तथा राज्य शिक्षण संस्था महामंडळाचे कार्याध्यक्ष विजय नवल पाटील यांचा ८१ वा वाढदिवस विविध ठिकाणी शैक्षणिक, सामाजिक,सांस्कृतिक व पर्यावरण पूरक उपक्रमांनी साजरा करण्यात आला. नवलभाऊ प्रतिष्ठान, रुक्मिणीताई प्रतिष्ठान, संजय एज्युकेशन तसेच ग्रामविकास मंडळ या विविध शैक्षणिक संस्थांच्या शाळा, महाविद्यालयात सामान्य ज्ञान स्पर्धा, सुंदर हस्ताक्षर स्पर्धा, वकृत्व स्पर्धा, निबंध स्पर्धा,चित्रकला स्पर्धेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव देण्यात आला.
येथील सावित्रीबाई फुले माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात निवृत्त केंद्रप्रमुख चिंधु वानखेडे व ज्येष्ठ शिक्षिका लता पवार या दांपत्याने माजी केंद्रीय मंत्री विजय पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त शाळेतील पाचवी ते दहावीच्या विद्यार्थिनींना शैक्षणिक साहित्य भेट स्वरूपात देण्यात आले. यावेळी दै. सकाळ मध्ये प्रसिध्द झालेल्या ‘सकाळ’चे तालुका बातमीदार उमेश काटे यांच्या लेखाचे सामूहिक वाचन विद्यार्थिनींनी केले. प्राचार्य गायत्री भदाणे अध्यक्षस्थानी होत्या. यावेळी विजय नवल पाटील यांच्या राजकीय, सामाजिक, शैक्षणिक कार्यावर प्रकाशझोत टाकणारे मनोगत उमेश काटे, जी पी हडपे, व्ही सी पाटील व गायत्री भदाणे यांनी केले. ज्येष्ठ शिक्षिका कल्पना महंत, लता पवार, एन बी खंडारे, नीलिमा पाटील श्रीमती निकम आदी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. दिलीप मनुरे व सुरेश पाटील यांनी सहकार्य केले.
▶️विविध ठिकाणी कार्यक्रम
संस्थेच्या मार्गदर्शिका शीलाताई पाटील , कार्याध्यक्ष अनिकेत पाटील, प्रशासकीय अधिकारी डी बी पाटील संस्थेचे मानद संचालक प्रा. सुनील गरुड, प्रशासकीय अधिकारी प्रा श्याम पवार यांच्या मार्गदर्शनाखाली परिसरातील नवलभाऊ कृषी महाविद्यालय, विजयनाना पाटील आर्मी स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, औद्योगिक प्रशिक्षण संस्था, रुक्मिणी ताई कला वाणिज्य महिला महाविद्यालय, राजीव गांधी प्राथमिक विद्यामंदिर, पंडित नेहरू माध्यमिक विद्यालय (फापोरे), सरस्वती माध्यमिक विद्यालय (सडावन), माध्यमिक विद्यालय (माळशेवगे) या ठिकाणी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला प्रशासकीय अधिकारी प्रा श्याम पवार, आयटीआयचे प्राचार्य किरण बाविस्कर, रुक्मिणीताई महिला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ एस जे शेख, कृषी महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ शुभांगी चव्हाण, उपप्राचार्य प्रा संदीप साळुंखे, फापोरे विद्यालयाचे मुख्याध्यापक पी ए पाटील, माळशवगे विद्यालयाचे मुख्याध्यापक मंगेश पाटील, सडावण विद्यालयाचे मुख्याध्यापक शरद अहिरराव, आर्मी स्कूलचे प्राचार्य पी एम कोळी, कमांडंट सुभेदार मेजर नागराज पाटील आदींसह सर्व प्राध्यापक, शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!