डॉ.उस्मान पटेल यांना महाराष्ट्र गौरव पुरस्कार

चोपडा (प्रतिनिधी) तालुक्यातील अडावद येथील आदिलशाह फारुकी बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने यंदाचा महाराष्ट्र गौरव डॉ. उस्मान फकीरा पटेल तालुका पारोळा जिल्हा जळगाव यांना देण्यात आला
शैक्षणिक,सामाजिक, पर्यावरण, वृक्षारोपण या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्या बद्दल त्यांना हा पुरस्कार देण्यात आला.
२८ नोव्हेंबर रविवारी जळगाव येथील अल्पबचत भवन याठिकाणी वितरित करण्यात आला.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गट शिक्षण विस्तार अधिकारी विजय पवार जळगाव हे होते तर अंकुर साहित्य परिषद सहसचिव हकीम आर चौधरी मुक्ताईनगर,लोकनियुक्त सरपंच भावना माळी अडावद,सरकारी वकील श्री कलंतरी, अब्दुल मजीद जकरीया जळगाव, अब्दुल करीम सालार जळगाव,संभाजी ब्रिगेड चे दिनेश भाऊ कदम मुक्ताईनगर,मण्यार बिरादरी जिल्हाध्यक्ष फारूक शेख,अल्पसंख्यांक सेवा संघाचे अध्यक्ष जहांगीर खान,हाजी फजल सेठ अडावद,रि. मुख्या. फारूक पटेल अडावद,मुख्याध्यापक शब्बीर अहमद अडावद, पीआर माळी अडावद,इम्रान खान अडावद,जहांगीर पठाण अडावद उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि सूत्रसंचालन संस्था अध्यक्ष फारूक शाह नौमानी यांनी केले तर जावेद शेख यांनी आभार व्यक्त केले.यावेळी रोशन शाह,अब्दुल कादिर शेख,जुबेर शाह, नजीर शेख,जब्बार शाह,अबुल मुजफ्फर शाह यांनी सहकार्य केले