आरोग्य सेवा हीच ईश्वर सेवा!-उद्योजक श्रीराम पाटील

▶️ डॉ.योगेश राणे यांना आदर्श वैद्यकीय अधिकारी पुरस्कार
मुक्ताईनगर (प्रतिनिधी) जिल्हा उपरुग्णालय येथे कोरोना महामारी ज्यांनी आपल्या जीवाचे रान करून जनतेला आरोग्यसेवा दिली अशा आशा आरोग्य दूत व देवदूतांना मानपत्र देऊन गौरव करण्यात आला या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्रीराम फाऊंडेशनचे अध्यक्ष व उद्योजक श्रीराम पाटील हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून तहसीलदार श्ववेत संचेती, पोलीस उप विभागीय अधीक्षक विवेक लावंड , जिल्हा उप रुग्णालयाचे डॉक्टर योगेश राणे, पोलीस निरीक्षक राहुल खताळ, ग्राम सुरक्षा दलाचे दिनेश कदम, हाकीम चौधरी, घनश्याम पाटील, आदी उपस्थित होते, म्हणाले की ज्यांनी आरोग्य सेवा केली ही खरी ईश्वराच्या अवतार असे म्हणले तरी अवघड ठरणार नाही डॉ. योगेश राणे यांच्या नावाने तालुका वासियांनी खऱ्या अर्थाने देव पाहिला असे प्रतिपादन श्रीराम फाउंडेशनचे अध्यक्ष श्रीराम पाटील यांनी केले. याप्रसंगी सर्व मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले या कार्यक्रमाचे आयोजन श्रीराम फाउंडेशन रावेर संत तुकाराम महाराज युवा फाउंडेशन मुक्ताईनगर ग्रामसुरक्षा दल मुक्ताईनगर यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते या कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी सचिन पाटील, किरण महाजन ,भागवत दाभाडे, अक्षय पाटील, गणेश मराठे या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन छबीलदास पाटील यांनी केले तर आभार घनश्याम पाटील यांनी मानले.
डॉ. योगेश राणे यांना आदर्श वैद्यकीय सेवा पुरस्कार
देऊन गौरवण्यात आले हा पुरस्कार श्रीराम फाउंडेशन रावेर यांच्या वतीने देण्यात आला या फाउंडेशनचे अध्यक्ष श्रीराम पाटील डॉ. योगेश राणे यांचे आरोग्यसेवेचे कार्य खूप मोठे त्यानिमित्ताने त्यांच्यासह त्यांच्या सर्व टीमला डॉ. देशमुख डॉ. अश्विनी पवार डॉक्टर श्रीकांत पाटील डॉ. प्रियंका पाटील डॉ. राजेंद्र काठेके, यांना मानपत्र देऊन गौरवण्यात आले फेस उपस्थित मान्यवरांनी सर्व टीमला पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.