जीवन संदेश;आयुष्य पण असेच आहे, वाचा..

टायटॅनिक डुबताना सगळ्यात शेवटचा इलाज म्हणून हवेत प्रकाशाचा बार सोडला गेला.
नऊ किलोमीटर अंतरावरच्या एका जहाजाने ते पहिले पण ते जहाज समुद्री जीवाचं तस्करी करणारे होते, त्यांनी विचार केला आपण मदतीला गेलो तर आपले भांडे फुटेल व आपला वेळ जाऊन नुकसान होईल ते गेले नाही.
अठरा किलोमीटरवर कॅलिफोर्निया नावाचे जहाज होते त्यांनीसुद्धा मदतीचा प्रकाश पाहिला, पण रात्रीची वेळ आहे वाटेत आईस बर्ग आहेत सकाळी जाऊ असे म्हणून टाळले व सकाळी गेले तोवर जहाज बुडून चार तास झाले होते.
68 किलोमीटर वर कॅथरीन नावाचं जहाज होते, त्यांनीही प्रकाश पाहिला व ते त्वरित मदतीसाठी धावले, पोहचले तोवर खूप उशीर झाला होता तरीपण त्यांनी चारशे पाचशे लोकांना वाचवले.
आयुष्य पण असचं आहे
आपल्याला आयुष्यात तीन प्रकारची लोकं भेटतात
1) त्यांच्या स्वार्थानुसार अजिबात तुमचा विचार नं करणारे
2) त्यांच्या वेळेनुसार, सवडीप्रमाणे मदत करणारे
3) कुठलाही विचार नं करता तुमच्या मदतीला बेधडक हात देणारे
▶️ पहिल्या दोन प्रकारच्या व्यक्ती जर योगायोगाने आयुष्यात परत आल्यातर त्यांच्यासाठी परत भावनिक होने म्हणजे शुद्ध मूर्खपणा होय.
▶️ तिसऱ्या प्रकारातली व्यक्ती चं मोल नं जाणणं म्हणजे आयुष्याचं स्वतःच्या हाताने मातेरं करणं होय.