जीवन संदेश:जीवनात अवघड तर काहीच नाही;वाचा ..

आपण समजा असं मानलं की , ही वेळ तुमच्यासाठी अनुकूल नाही आणि तुम्ही यावर नियंत्रणही ठेवू शकत नाही . ज्या गोष्टीवर आपलं नियंत्रण नाही , त्यासाठी आपण आपला वर्तमानकाळ का खराब करायचा ?
▶️ तुमच्या दिवसाची सुरुवात सकारात्मक दृष्टिकोनातून करा . उठल्यानंतर लगेच मोबाइल किंवा टीव्ही बघू नका , तुम्ही बघत असलेल्या बातम्यांमुळे मनात भीती निर्माण होऊ शकते , भविष्याविषयी चिंता वाटू शकते . दुसऱ्यांबरोबर बोलण्यापूर्वी काही मिनिटं मौन पाळा . मग या गोष्टीचा विचार करा की , तुम्ही तुमचा दिवस कसा घालवू इच्छित आहात . सुखद परिणामांची कल्पना भविष्यातील क्षणांसाठी सकारात्मक गुंतवणूक ठरते . सकारात्मक राहण्याचा एक उत्तम उपाय म्हणजे आपल्या घरात गुड फीलवाल्या शब्दांचं लेबल लावा . म्हणजे प्रेम , आनंद , शांती , चांगलं आरोग्य , साहस , कृतज्ञता यांना आपल्या डेस्क , कॉम्प्युटर , वॉर्डरोब , आरसा आणि रेफ्रिजरेटवर लावा .
▶️ ज्या प्रकारे आपण बोलतो किंवा विचार करतो , ती आपली वास्तविकता बनते . आपल्याला असं वाटलं की , आपण अडकतोय , तर आपली जीवन बदलण्याची इच्छा असूनही केवळ नकारात्मक विचारांमुळे आपण त्यामध्ये अडकू . लक्षात ठेवा , जिथे समस्या आहे तिथे समाधानही आहेच . आपल्याला असं वाटत असेल की , आपली स्थिती असह्य आहे , तरी तिथे एक रस्ता असतोच , पण आपण इतर लोक आणि जगाला दोष दिला तर आपण त्यामध्येच व्यस्त राहू आणि समस्येचं समाधान निघणारच नाही . मार्गदर्शन आणि मनात चालू असलेल्या प्रश्नांची उत्तरं मिळण्यासाठी आपल्याला सक्षम होण्यासाठी धैर्य आणि शांतता टिकवून ठेवणे गरजेचे आहे .
▶️ कोणालाही मदत करणे , आनंद देणारेच काम आहे . सध्या अनेक लोक सेवाकार्यात आपलं मन रमवत आहेत . ध्यान करणं हा मनातील नकारात्मक किंवा खूप विचारांवर विजय मिळविण्याचा एक चांगला उपाय आहे . म्हणून दुसऱ्या व्यक्तींसाठी काही चांगलं करा . इतरांसाठी निःस्वार्थ भावनेने काम करण्याने मेंदूतील अनेक विचार निघून जातात , जे आपल्याला चिंतित करतात . यामुळे छान वाटते . तुम्ही तुमच्या जीवनास सांभाळण्यास आणि त्याचं मूल्य समजण्यस सुरुवात करा .
▶️ कधी कधी नकारात्मक विचार आणि चिंतांची कडी तोडण्यासाठी एक हास्य पुरेसे आहे . यामुळे आपला मूड बदलण्यास आणि तणाव दूर करण्यास मदत होते . तुम्हाला हसावंसं वाटत नसेल तरी हसण्याचा प्रयत्न करा . कारण या प्रयत्नात मेंदू हे जाणत नाही की , नक्की काय होत आहे . आरशासमोर उभे राहा आणि स्वतःचा हसरा चेहरा बघा . तुम्हाला हलकं आणि अधिक सकारात्मक वाटेल .
▶️ अवघड परिस्थितीत आपण चिंतित होतो . कारण आपण भविष्याला नियंत्रित करण्याचा प्रयत्न करतो . तुमच्या वर्तम नकाळावर लक्ष केंद्रित करा . विश्वास ठेवा की , जर तुम्ही आज मध्ये जगलात , तर या अवघड काळातून खूप सहजपणे बाहेर पडाल