शिवकार्य मावळे सूरत,गुजरात द्वारा शिवराज्याभिषेक सोहळा साजरा!

सुरत (गुजरात)/प्रतिनिधी /निवृत्ती पाटील
शिवकार्य मावळे सुरत गुजरात गृप दर रविवारी महापुरुषांचे स्मारक वर स्वच्छता करून फूल अर्पण अशी मोहिम राबवतात व त्या गृपची गड किल्ले स्वच्छता मोहीम एक लक्ष्य आहे. शिवकार्य मावळे सूरत-गुजरात द्वारा श्री छत्रपती शिवाजी महाराज स्मारक (नवागाम डिंडोली) श्री छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे शिवराज्याभिषेक सोहळा साजरा केला,तसेच शिवकार्य मावळे सुरत गुजरात गृप द्वारा श्री छत्रपती शिवाजी महाराज राज्याभिषेक सोहळा सुरत ते बारडोली व सुरत ते नवसारी या ठिकाणी श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवराज्याभिषेक सोहळा साजरा करण्यात आला. यासाठी श्री शिवछत्रपती युवा मित्र मंडळ, एकता सामाजिक मित्र मंडळ, श्री भिमसैनिक मित्र मंडळ, श्री छत्रपती शिवाजी महाराज स्मारक समिति सुरत,व (नवागाम डिंडोली) यांनी विशेष परिश्रम घेतले.
