कोरोनावर नवीन औषध आले भारतात; एका आठवड्यात रुग्ण होणार बरा ?

0

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना कोरोना झाल्यानंतर वापरण्यात आलेलं औषध भारतातही उपलब्ध झालं आहे. कोरोना रुग्णांवर उपचार करण्यासाठी अधिकाधिक प्रभावी औषध, लस कंपन्या भारतात आणत आहेत.
‘अ‍ॅण्टीबॉडी कॉकटेल’ असं या औषधाचं नाव असून, अ‍ॅण्टीबॉडी कॉकटेल हे दोन वेगळ्या अ‍ॅण्टीबॉडीपासून तयार करण्यात आलेलं असून, प्रयोगशाळेत विकसित करण्यात आलेलं आहे.
अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर ‘अ‍ॅण्टीबॉडी कॉकटेल’ उपचार पद्धतीचा वापर करण्यात आला होता. आता केंद्र सरकारने याला परवानगी दिली आहे.
आता कोरोना रुग्ण एका आठवड्यात बरा होऊ शकतो, एआयजी रुग्णालयाने ‘अ‍ॅण्टीबॉडी कॉकटेल’चा उपचारात वापर करणं सुरू केलं आहेत. त्याचबरोबर नव्या म्युटेशनवर ते किती प्रभावी आहे, यावरही अभ्यास केला जात आहे, असं रेड्डी म्हणाले.
या औषधाच्या वापरामुळे कोरोना रुग्ण एका आठवड्यातच आरटी-पीसीआर टेस्ट निगेटिव्ह होऊ शकतो. कोरोनाच्या डबल म्युटेशनवर ‘अ‍ॅण्टीबॉडी कॉकटेल’ किती प्रभावी आहे, याचा आम्ही एआयजीमध्ये अभ्यास करत आहोत, असं रेड्डी म्हणाले.
“अ‍ॅण्टीबॉडी कॉकटेलच्या परिणामाबद्दलचे पुरावे अद्याप स्थापित होऊ शकलेले नसले, तरी न्यू इंग्लड जर्नल ऑफ मेडिसिनसह विविध जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या परीक्षण उत्साहवर्धक आहेत. अ‍ॅण्टीबॉडी कॉकटेलमुळे रुग्णाला रुग्णालयात भरती करण्याची वा मृत्यूची शक्यता 70 टक्क्यांनी कमी होते,” असंही रेड्डी म्हणाले.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!