म्युकरमायकोसिस आजार संसर्गजन्य आजार नाही-आरोग्य मंत्रालय

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) कोरोनाची दुसरी लाट संपत असतानाच आता म्युकरमायकोसिस (काळी बुरशी) हा आजार वाढत आहे.कोरोनातून बरे झालेल्यांमध्ये हा आजार प्रामुख्याने दिसून येत आहे.त्यामुळे भीतीचे वातावरण पसरले आहे.मात्र या आजाराचा संसर्ग होत नसल्याचा निर्वाळा केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिला आहे.अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेचे (एम्स) संचालक डॉ.रणदीप गुलेरिया यांनी काळ्या बुरशीबाबत सोमवारी पत्रकार परिषदेत विस्तृत माहिती दिली,ते म्हणाले की,’शरीराच्या विविध भागांत पसरू शकणाऱ्या या बुरशीचा रंग वेगवेगळा आहे.मात्र हा आजार संसर्गजन्य नाही.ज्यांची रोगप्रतिकारशक्ती कमी आहे त्यांना हा आजार पटकन होत असल्याचे दिसून आले आहे.साधारणत: श्वासनलिका,नाक आणि डोळ्यांभोवतालची हाडे यांमध्ये ही बुरशी होते आणि त्याचा मेंदूपर्यंत प्रसार होऊ शकतो.फुप्फुसांतही ही बुरशी आढळू शकते.
▶️ काय आहेत लक्षणे ?
▪️नाकात वेदना होणे
▪️घशात त्रास जाणवणे
▪️चेहऱ्यावरील स्पर्शसंवेदना कमी होणे
▪️पोटात दुखणे
▪️ खोकला येणे
▪️अंगदुखी
▪️श्वसनाला त्रास जाणवणे
▪️झोप न लागणे
▶️ उपाययोजना काय करावी?
▪️घरात स्वच्छता ठेवावी
▪️गरम पाणी सतत पीत राहावे
▪️योगासने करावीत
▪️लक्षणे आढळल्यास तातडीने वैद्यकीय सल्ला घ्यावा