विकेंड लाँकडाऊनच्या नावाखाली सुरू केलेले पूर्ण लाँकडाऊन तात्काळ उठवा; पारोळा भा.ज.पा.चे निवेदन

▶️ रेमडिसिवर इंजेक्शनचा काळाबाजार थांबवा
पारोळा(प्रतिनिधी) तालुका भारतीय जनता पार्टी व व्यापारी आघाडी कडून पारोळा तहसीलदार अनिल गंवादे यांना निवेदन देण्यात आले
सदर निवेदनाद्वारे ब्रेक द चेन या शासनाच्या जटील नियमामुळे महाराष्ट्रात विकेंड लाँकडाऊन सुरु करण्याची घोषणा झाली होती परंतु दुसऱ्याच दिवशीं संपूर्ण लाँकडाऊन राबविण्याबाबत शासनाने उचलेले पाऊल अत्यंत निषेधार्थ आहे अशा प्रकारच्या निर्णयाचा आम्ही निषेध करतो .शासनाने सर्व व्यापारी बांधवाचे सर्व दुकाने चालू न झाल्यास भारतीय जनता पक्ष व्यापारी आघाडी करून तीव्र असे आंदोलन छेडण्यात येईल.या आंदोलनात काही नुकसान झाल्यास शासन व प्रशासन यास कारणीभुत राहील.तसेच या कोरोना काळात आरोग्य सेवा देणारेच आताच्या घडीला काळाबाजार चालवीत आहेत.त्यात कोरोना पेशंटला अत्यावश्यक असणारे इंजेक्शन रेमडिसिवर चे पारोळा तालुक्यात मोठ्या प्रमाणावर काळाबाजार चालू आहे शासनाने ठरवून दिलेल्या किंमती पेक्षा चार पटीने पेशंट च्या नातेवाईकांकडून पैसे उकडण्यात येत आहे यांचा काळाबाजार त्वरित थांबवावा व जास्त पैसे घेणाऱ्या वर तत्काळ
गुन्हे दाखल करून त्यांचे परवाने रद्द करण्यात यावे .या दोन्ही विषयांवर निवेदन दिले आहे .परंतु याबाबत निर्णय न घेतल्यास भाजपा कडून तीव्र आंदोलन करण्यात येईल,असा इशारा दिला. यावेळी अँड अतुल मोरे, रविंद्र पाटील,केशव क्षत्रिय ,संजय कासार,मिलिंद विसपुते, गोपाल दाणेज ,विनोद सिंधी ,धिरज महाजन ,सचिन गुजराथी,युवराज पाटील,समीर वैद्य,नरेंद्र साळी आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.