लाॅकडाऊन विरोधात पारोळा व्यापारी महासंघ रस्त्यावर!

0

➡️तहसिलदार,पोलिस स्टेशन,नगरपालिकेला दिले निवेदन

पारोळा (प्रतिनिधी) निर्बंधाच्या नावाखाली लाॅकडाऊन करून व्यापा-यांची फसगत करण्यात आली असुन या लाॅकडाऊन विरोधात संपुर्ण राज्यभर निर्देशने व निवेदने देण्यात येत आहेत पारोळा व्यापारी महासंघाच्या वतीने ही आज पारोळा तहसिलदार ,पोलिस स्टेशन,व पारोळा नगर पालिकेला लाॅकडाऊन विरोधात निवेदन देण्यात आले,या निवेदनात ‘ब्रेक द चैन’ या गोंडस नावा खाली अगोदर विकेंड लाॅकडाऊन सांगून नंतर मात्र काही बाबी सुरू तर काही बंद म्हणुन संपुर्ण लाॅकडाऊन करण्यात आला, शासनाने व्यापाऱ्यांची फसगत केल्याचे म्हटले आहे, म्हणुन आम्ही व्यापारी महासंघाच्या वतीने या निर्णयाचा निषेध करतो,तसेच अत्यावश्यक सेवा सुरू मात्र इतर दुकाने बंद मग इतर व्यापाऱ्यांनी बॅकेचे हप्ते,लाईट बिल,कामगाराचे पगार कसे द्यायचे अत्यावश्यक मध्ये उत्पादन सुरू मात्र विक्री बंद, बांधकाम सुरू मात्र बिल्डींग मटेरियल दुकाने बंद,लग्नाला परवानगी मात्र कापड भांडे, फुट वेअर बंद असा टाकणार अध्यादेश देण्यात आला.

आता कुठे व्यापारी मागच्या लाॅकडाऊन मधून सावरत आहे व पुन्हा लाॅकडाऊन हा व्यापा-यांना न परवडणारा आहे,व्यापा-यां बरोबर कामगारावर ही उपासमारीची वेळ आलेली असुन शासनाने हा लाॅकडाऊन त्वरित मागे घ्यावा व व्यापारी व कामगाराना न्याय द्यावा अन्यथा आम्ही व्यापारी व कामगार कुंटुबासोबत आमरण उपोषण करू कोरोनाने नंतर परंतु भुकेनेच आम्ही मरू अशी हार्त हाक शासनाला दिली आहे,तरी शासनाने याचा गांभिर्याने विचार करून व्यापा-यांना न्याय द्यावा असे या निवेदनात म्हटले आहे, निवेदनावर शहरातील कापड व्यापारी असोशिएशन,सराफ असोशिएशन,भांडे व्यापारी संघटना,फुट वेअर संघटना,कटलेरी संघटना,इलेक्ट्रानिक्स असोशिएशन , पारोळा नाभिक संघ,तसेच इतर संघटनेच्या पदाधिकाऱ्यांच्या स्वाक्ष-या आहेत,यावेळी पारोळा व्यापारी महासंघाचे अध्यक्ष केशव क्षत्रीय,उपाध्यक्ष अशोक लालवाणी,सचिव,संजय कासार,महेश हिंदुजा,रोशन शहा,धर्मेंद्र हिंदुजा,गोपाल दाणेज,प्रतिक मराठे,तसेच नाभिक समाजाचे पदाधिकारी व इतर व्यापारी संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते,

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!