वीजबिल प्रश्न १० दिवसात निकाली लावा अन्यथा मुख्यमंत्री निवासस्थानी सत्याग्रह करु -आप

0

चोपड़ा (प्रतिनिधी) येथील आप च्या कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना एका पत्राद्वारे मागणी केली आहे.

▶️ पत्रातील प्रमुख मागण्या-

१. आपण जनतेला ३०% स्वस्त वीज देण्याच्या वचननाम्याची पूर्तता करण्यात यावी.
२. कोविड दरम्यानचे मार्च ते ऑगस्ट या महिन्याचे २०० युनिट वीजबिल माफी करावी,
३. मार्च २०२० ते मार्च २०२१ या काळातील थकीतवर कोणतेही व्याज आकारू नये.
४. शेतकऱ्यांना सरसकट विजबील माफी करावी,
५. वीज कंपन्यांचे CAG ऑडीट करण्यात यावे,
६. दि. १ एप्रिल २०२० पासून केलेली वीज दर वाढ मागे घ्यावी.

आपण राज्यातील जनतेच्या सहनशक्तीचा अंत न पाहता वरील मागण्या येत्या १० दिवसात निकाली काढाव्यात, अन्यथा नाईलाजास्तव आम आदमी पार्टी राज्याचे प्रमुख या नात्याने वचनपूर्ती साठी मुख्यमंत्री निवासस्थानाबाहेर सोमवार दि १९ एप्रिल २०२१ रोजी सत्याग्रह करावा लागणार आहे. असे निवेदन प्रांताधिकारी सुमित शिंदे यांच्यामार्फत मुख्यमंत्री कार्यालयात पाठविले. निवेदन देतांना जिल्हा सहसंयोजक विठ्ठलराव साळुंखे व जिल्हा सचिव रईस खान,राजमल पाटील उपस्थित होते.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!