प्रजाराज्य न्यूज;आजच्या हेडलाईन्स !

0

बुधवार, 7 एप्रिल 2021

▶️ महाराष्ट्रात 4,72,283 सक्रिय कोरोनाग्रस्त रुग्ण तर 25,83,331 रुग्ण कोरोनामुक्त; एकूण 56,330 रुग्णांचा मृत्यू.

▶️ भारतात 8,38,633 सक्रिय कोरोनाग्रस्त रुग्ण तर 1,17,89,759 रुग्ण कोरोनामुक्त; एकूण 1,66,208 रुग्णांचा मृत्यू

▶️ शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांचे निकटवर्तीय बिल्डर योगेश देशमुख यांना अटक; मनी लाँड्रिंगप्रकरणी सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) केली अटक

▶️ पुणे: पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात लग्नांसाठी 50 लोकांची मर्यादा कायम; परंतु वऱ्हाडींना ‘आरटीपीसीआर’ चाचणी करून निगेटिव्ह असल्याचा दाखला सोबत ठेवणे बंधनकारक

▶️ अहमदनगर : जिल्ह्यात 24 तासांत कोरोनाचे 13 बळी, बरे होण्याचे प्रमाण 88 टक्क्यांवर घसरले; सध्या 10 हजार 766 रुग्णांवर उपचार सुरू

▶️ राज्यातील सर्व सहकारी संस्थांच्या निवडणुका 31 ऑगस्टपर्यंत लांबणीवर, राज्य सरकारने घेतला निर्णय; कोरोनामुळे तिसऱ्यांदा निवडणुका पुढे ढकलण्याची वेळ

▶️ राज्य सरकारने लागू केलेल्या निर्बंधांमुळे आता शिवभोजन केंद्रावर देखील शिवभोजन थाळी ही पार्सल स्वरूपात उपलब्ध होणार; मंत्री छगन भुजबळ यांची माहीती

▶️ ‘प्रशासकीय कामात कुठलाच हस्तक्षेप करणार नाही’; दिलीप वळसे-पाटील यांनी हाती घेतली गृहमंत्री पदाची सूत्रे

▶️ भारत चीनला धोबी पछाड देणार, 2021 मध्ये विकास दर 12.5 टक्के राहण्याचा आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचा अंदाज

▶️ वाढत्या कोरोनामुळे ‘ब्रेक द चेन’ अंतर्गत उपाय म्हणून पुढील आठवडा मुंबई हायकोर्टातील न्यायालयीन कामकाज पूर्णपणे बंद राहणार

▶️ निवडणूक: पश्चिम बंगाल आणि आसामसह 5 राज्यांत बंपर मतदान; मतदारांचा कौल EVM मध्ये बंद; आणखी काही टप्पे बाकी.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!