प्रजाराज्य न्यूज – हेडलाईन्स!

बुधवार,31 मार्च 2021,
▶️ शरद पवार यांच्यावर ब्रीच कँडी रुग्णालयात यशस्वी शस्त्रक्रिया; शरद पवार त्रास अधिक जाणवू लागल्यामुळं मंगळवारी रुग्णालयात झाले होते दाखल
▶️ परमबीर सिंह यांनी गृहमंत्र्यांवर केलेल्या आरोपांच्या चौकशीसाठी समिती, सहा महिन्यात अहवाल सादर करणार
▶️ महाराष्ट्रात 3,40,542 सक्रिय कोरोनाग्रस्त रुग्ण तर 23,77,127 रुग्ण कोरोनामुक्त; एकूण 54,422 रुग्णांचा मृत्यू
▶️ दीपाली चव्हाण आत्महत्या प्रकरण: वादग्रस्त असलेले मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचे माजी क्षेत्र संचालक एम. एस. रेड्डी यांचे निलंबन
▶️ अहमदनगर : कीर्तनकार निवृत्ती महाराज देशमुख इंदुरीकर यांना दिलासा; कनिष्ठ न्यायालयाने दिलेला खटला चालविण्याचा आदेश सत्र न्यायालयात रद्द
▶️ खाद्यतेल दरांत 60 रुपयांपर्यंत वाढ; देशाची एकूण गरज विचारात घेऊन 60 ते 65 टक्के खाद्यतेल परदेशातून करावे लागते आयात
▶️ सोशल मीडिया पोस्टवरून आव्हाडांच्या बंगल्यावर तरूणाला मारहाण झाल्याचं प्रकरण; जितेंद्र आव्हाड यांच्या बंगल्यावरील ‘त्या’ पोलिसांचे सीडीआर, एसडीआर डीलिट करू नका, हायकोर्टाचे निर्देश
▶️ भारतात 5,49,085 सक्रिय कोरोनाग्रस्त रुग्ण तर 1,14,32,052 रुग्ण कोरोनामुक्त; एकूण 1,62,502 रुग्णांचा मृत्यू
▶️ बिहार: एका कुटुंबातील 6 चिमुकल्यांचा जळून मृत्यू, कणीस भाजताना चाऱ्याला आग लागल्याने घडली दुर्घटना; सरकारने मृतांच्या कुटुंबाला 4-4 लाखांची दिली नुकसान भरपाई
▶️ भारताच्या ट्वेन्टी-20 महिला संघाची कर्णधार आणि अनुभवी फलंदाज हरमनप्रीत कौरला कोरोनाची लागण, दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या ट्वेन्टी-20 मालिकेतून दुखापतीमुळे घेतली होती माघार