पुन्हा एका सरकारी कर्मचाऱ्याची आत्महत्या!

सातारा (प्रतिनिधी)साताऱ्यातील कोयनानगर येथील कोयना बांधकाम विभागातील कर्मचाऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. लिपिक संतोष बंडू कुंभार यांनी शासकीय निवासस्थानी गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. संतोष हे जून 2020 मध्ये जलसंपदा विभागातील कोयना बांधकाम विभागात लिपिक पदावर कामास सुरुवात केली होती.
संतोष यांनी कर्जबाजारीपणामुळे आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती समोर येत असून कोयनानगर पोलीस या घटनेचा तपास करीत आहेत. गेल्या काही दिवसांपासून देशात आत्महत्येच्या घटना वारंवार समोर येत आहे. कोयनानगर बांधकाम विभागातील एका कर्मचाऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे.