MIDC चा सर्व्हर झाला हॅक;500 कोटींची मागणी

0

MAHARASHTRA INDUSTRIAL DEVELOPMENT CORPORATION

मुंबई (वृत्तसंस्था) महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचा सर्व्हर हॅक झाल्याची घटना घडली आहे. यामुळे संपूर्ण राज्यात एकच खळबळ उडाली असून हॅकर्सकडून पाचशे कोटींची मागणी केली आहे.MIDC च्या अधिकृत मेल आयडीवर 500 कोटींच्या मागणीचा मेल आल्याची माहिती समोर येतेय.
जर मागणी पूर्ण केली नाही तर हॅक करण्यात आलेल्या सर्व्हरवरील महत्वाचा डेटा नष्ट करुन टाकू अशी धमकीही हॅकर्सनी दिली आहे. दरम्यान डेटा रिस्टोर करून तसा सायबर सेलकडे तक्रार करावी असं मत सायबर तज्ज्ञांनी मत मांडले आहे.
सोमवारपासून MIDC सर्व्हर हॅक झाल्याने राज्यातील मुंबईतील मुख्य कार्यालयासह 16 प्रादेशिक कार्यालयातील संपूर्ण कामकाज बंद पडले आहे. एमआयडीसीशी संबंधीत सर्व औद्योगिक वसाहती, उद्योजक, शासकीय घटक आणि विविध योजनांची संपूर्ण माहिती ही एका ऑनलाईन सिस्टिमवर आहे. या सिस्टिम सर्व्हरचा डेटा हॅक झाला आहे. त्यामुळे सोमवारपासून संपूर्ण कामकाज ठप्प झाले आहे. MIDC तील कॉम्प्युटर सुरु केल्यानंतर त्यात व्हायरस दिसत आहे. त्यामुळे जर या सिस्टिममध्ये प्रवेश केला, तर डाटा नष्ट होण्याचा धोका आहे. त्यामुळे MIDC सर्व कार्यालयांना कॉम्प्युटर सुरु करु नका, अशी सूचना केली आहे.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!