30 मार्च 2021,मंगळवार

▶️ नांदेड येथे हल्ला मोहल्ला हल्लाबोल कार्यक्रमादरम्यान पोलिसांवर हल्ला; 4 पोलीस गंभीर तर 10 जखमी; हल्ला मोहल्ला मिरवणूक काढू न दिल्यामुळे पोलिसांवर हल्ला

▶️ राष्ट्रवादी काँग्रेसचा लॉकडाऊनला विरोध; लॉकडाऊन ऐवजी अन्य पर्यायांवर विचार करण्याची मुख्यमंत्र्यांकडे केली मागणी

▶️ महाराष्ट्रात 3,36,584 सक्रिय कोरोनाग्रस्त रुग्ण तर 23,53,307 रुग्ण कोरोनामुक्त; एकूण 54,283 रुग्णांचा मृत्यू

▶️ राज्यातील अभियांत्रिकी, वैद्यकीय, व्यवस्थापन, हॉटेल मॅनेजमेंट आदी तंत्रशिक्षण अभ्यासक्रमाच्या सुमारे 40 टक्के जागा रिक्त

▶️ काम असेल त्यांनीच कोर्टात यावे! मुंबई उच्च न्यायालयाचे आदेश; न्यायालयाचे कामकाज दोन पाळ्यात, मंगळवार (ता.30) पासून न्यायालयातील कर्मचाऱ्यांची संख्या 50 टक्के घटविली

▶️ औरंगाबाद: जिल्ह्यात आता 30 नव्हे 31 मार्चपासून ते 9 एप्रिलपर्यंत लागणार लॉकडाऊन; पेट्रोल पंप सर्वांसाठी खुले, पण वेळेचे राहील बंधन; जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी 12 वाजेपर्यंतची मुभा, त्यानंतर सर्वच बंद

▶️ भारतात 5,37,511 सक्रिय कोरोनाग्रस्त रुग्ण तर 1,13,90,829 रुग्ण कोरोनामुक्त; एकूण 1,62,147 रुग्णांचा मृत्यू

▶️ पिंपरी – गेल्यावर्षी तब्बल 175 बालगुन्हेगारीचे गुन्हे नोंदवले, या गुन्ह्यांत 256 विधिसंघर्षित मुला-मुलींना घेतले ताब्यात

▶️ नाशिक: वाढत्या कोरोना संसर्गामुळे शहरातील मुख्य बाजारपेठेत जाणारे रस्ते बंद; बाजारपेठेत जाण्यासाठी प्रति तास पाच रुपये प्रतिव्यक्ती आकारले जाणार

▶️ भारताच्या ऑलिम्पिक नेमबाजी संघाची निवड 3 किंवा 4 एप्रिलला; प्रत्येक स्पर्धा प्रकारात 2 राखीव खेळाडू; भारतीय रायफल संघटनेचे स्पष्टीकरण

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!