रिता बावीस्कर यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बुलढाणा जिल्हा निरीक्षक पदी निवड !

अमळनेर (प्रतिनिधी) येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेश सचिव व राष्ट्रवादी ग्रंथालय विभाग प्रदेश समन्वयक रिता भूपेंद्र बावीस्कर यांची पक्ष बळकटीसाठी, संघटनसाठी व पक्षाची ध्येय धोरणे सर्व सामान्य नागरिकांना पोहोचण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बुलढाणा जिल्हा निरीक्षक पदी निवड करण्यात आली असून त्याचे नियुक्ती पत्र राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेश अध्यक्षा सौ रुपाली चाकणकर यांनी दिले आहे.
त्यांच्या निवडीबद्दल आमदार अनिल पाटील व राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व पदाधिकारी यांनी अभिनंदन केले आहे.