मुस्लिम मानियार बिरादर बिरादरीची सामाजिक बांधिलकी;रेमडेसिव्हर इंजेक्शन ७४९ रुपयात

0

▶️ गरीब रुग्णांसाठी रेमडेसिव्हर इंजेक्शन मोफत

जळगाव (प्रतिनिधी) जिल्ह्यात सोशल मीडिया च्या माध्यमाने सुरू असलेल्या चर्चेत अकोला येथील दत्त मेडिकल जर ७५० रूपयांना इंजेक्शन देत असेल तर जळगावला का मिळू शकत नाही ? हा विषय चर्चिला जात होता. या बाबत जळगाव जिल्हा मुस्लिम मनियार बिरादरी चे अध्यक्ष फारुक शेख यांनी जळगावात रेमडेसिव्हर इंजेक्शन सर्वप्रथम १०५०/ रुपयात उपलब्ध करून दिला होता. त्यांनी या चर्चेत जळगाव व मुंबई येथील मित्र परिवार यांच्या सहकार्याने जळगावात रेमडेसिव्हर इंजेक्शन हे ७४९/- रुपयात उपलब्ध करून दिले व मंगळवार पासून सदरचे इंजेक्शन जळगावा येथील पांडे चौकातील के परवीन मेडिकल स्टोर मध्ये विक्रीला उपलब्ध केले आहे.

सदर चे इंजेक्शन घेणे साठी मेडिकल स्टोअर ला कुपन दिल्यावरच त्यांना इंजेक्शन मिळणार आहे.

जे रुग्ण अगदी गरीब असून रेमडेसिव्हर चा खर्च उचलू शकत नाही त्यांना संपूर्ण ६ इंजेक्शन मोफत देण्यात येईल असे सुद्धा फारूक शेख यांनी प्रसिद्धीला दिलेले आहे

▶️ सिटी स्कॅन व रक्त तपासणीसाठी विशेष सूट

बिरादरी ने यापूर्वी एच आर सि टी तपासणी सुद्धा फक्त १८००/- रुपयात व सम्पूर्ण कोविड रक्त तपासणी फक्त १३००/- रुपयात उपलब्ध करून दिलेली आहे.
जळगाव मुस्लिम मानियार बिरादरी च्या कोविड रुग्णा साठी महाराष्ट्रात जळगाव मनियार पॅटर्न म्हणून ओळखले जात आहे.अधिक माहिती व संपर्कासाठी ९४२३१८५७८६ यावर संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!