अनुदानाबाबत तीन दिवसात योग्य ती कार्यवाही केली जाईल : शिक्षण संचालक कृष्णकुमार पाटील

0

राज्य शिक्षण संस्था महामंडळ व कृती समितीच्या शिष्टमंडळाला आश्वासन
पुणे (वृत्तसंस्था) विना अनुदानीत शाळांना येत्या तीन दिवसांच्या आत टप्पावाढीचे आदेश पारित करण्यासंबंधी योग्य ती कार्यवाही केली जाईल. संबंधित अधिका-याना तसे लेखी आदेशही देण्यात येतील, असे सकारात्मक आश्वासन शिक्षण संचालक कृष्णकुमार पाटील (पुणे) यांनी दिले. राज्य शिक्षण संस्था महामंडळा चे कार्याध्यक्ष तथा माजी केंद्रीय मंत्री विजय नवल पाटील तसेच महाराष्ट्र राज्य (कायम) विनाअनुदानित शाळा कृती समितीच्या वतीने राज्य उपाध्यक्ष खंडेराव जगदाळे व शिवराम म्हस्के यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने आज पुणे येथे भेट घेतली. त्यावेळी हे आश्वासन देण्यात आले. यावेळी माजी शिक्षण संचालक महेश पालकर तसेच शिक्षण विभागाचे अधिकारी वर्ग उपस्थित होते. त्यांनी तात्काळ अनुदान पात्र शाळेची यादी घोषित करावी असा आग्रह धरला.या भेटीमध्ये विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. राज्य शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या वतीने निर्गमित करण्यात आलेल्या दि.०६/०२/२०२३ रोजीच्या अनुदानासंबंधिच्या शासन निर्णयावर चर्चा करण्यात आली. राज्य शिक्षण संस्था महामंडळाचे कार्याध्यक्ष विजय नवल पाटील यांनी मध्यस्थी करून येत्या चार ते पाच दिवसात त्रुटी पूर्तता केलेल्या शाळा तुकड्या प्राथमिक व माध्यमिक यांना लवकरात लवकर घोषित करावे व मार्चपूर्वी शिक्षकांचे पगारी अनुदानाचा टप्पा सुरू करावा असा आग्रह संचालकाकडे धरला. त्यावेळेस त्यांनी तत्वतः मान्य करून शिष्टमंडळाला आश्वासित केले. जर येत्या पाच-सहा दिवसात यादी निघाली नाही तर पुन्हा एकदा आम्ही आंदोलनाचा पवित्रा घेऊ असे शिष्टमंडळाने सांगितले दरम्यान विजय नवल पाटील यांनी यथोचित मध्यस्थी करून शिक्षण संचालकाकडून शब्द घेतला की चार-पाच दिवसात व घोषित शाळा व तुकड्या टप्प्यासहित आम्ही जाहीर करू या शिष्टमंडळामध्ये महामंडळाचे आणखी पदाधिकारी हजर होते. आजची बैठक यशस्वी होण्यासाठी विनाअनुदान कृती समितीने अतिशय आवेश पूर्ण पाठपुरावा केला.या मुळे राज्यातील शिक्षकांच्या आशा पल्लवीत झाल्या.यावेळी राज्यातील विविध भागातील ५० शिक्षकांसह एस एन पाटील, भटू पाटील, एस डी सूर्यवंशी, संदीप वायसे, राजेश चव्हाण, उमेश काटे, एस एस बिऱ्हाडे, बिपिन काटे आदी उपस्थित होते, असे महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळाचे प्रा सुनील गरुड यांनी कळवले आहे.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!