जिल्हानिहाय वेतन निधी तात्काळ वितरीत;मा.केंद्रीय मंत्री विजय नवल पाटील यांच्या प्रयत्नांना यश

पुणे (वृत्तसंस्था) राज्यातील सैनिकी शाळेतील शिक्षकांचे लेखाशीर्ष 2202- एच 973 यासह 2202/1901, 2202/1948 या लेखाशीर्षे लाही वेतन निधी मंजूर असूनही वेतन निधी जिल्हानिहाय वितरीत झाला नव्हता या पार्श्वभूमीवर राज्य शिक्षण संस्था महामंडळ चे कार्याध्यक्ष तथा माजी केंद्रीय मंत्री विजय नवल पाटील यांनी आज पुणे येथील शिक्षण संचलनालय येथे शिक्षण संचालक कृष्णकुमार पाटील यांच्यासह सैनिकी शाळा विभागाचे श्री राठोड यांची भेट घेतली. यावेळी राज्य सैनिकी शाळा कृती समितीचे राज्य समन्वयक उमेश काटे हे ही उपस्थित होते. निधी मंजुरीचे शासन परिपत्रक बुधवारी (ता.15) निर्गमित करण्यात आले आहे. मात्र चार-पाच दिवस होऊनही जिल्हा निहाय वेतन निधी वितरित केलेला नाही. त्यामुळे राज्यातील 230 शाळेतील शिक्षकांचे दोन महिन्यांपासून वेतन झालेले नाही. किमान वेतन निधी तरी तात्काळ वितरित करावी अशी मागणी करण्यात आली. या पार्श्वभूमीवर आज सायंकाळ पर्यंत जिल्हानिहाय वेतन निधी वितरित करण्याबाबतचे परिपत्रक काढण्यात आले. त्यामुळे वेतनाचा प्रश्न मार्गी लागल्याने शिक्षकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे. यावेळी ग्रामविकास शिक्षण मंडळाचे प्रशासकीय अधिकारी एस एन पाटील, सहाय्यक प्रशासकीय अधिकारी भटू पाटील, निवृत्त मुख्याध्यापक एस डी सुर्यवंशी, पनवेल आर्मी स्कूलचे संदीप वायसे, राजेश चव्हाण, एस एस बिऱ्हाडे, बिपिन काटे सर आदी उपस्थित होते. दरम्यान वेतन निधी वितरणाचा तात्काळ प्रश्न मार्गी लागल्याने माजी मंत्री विजय नवल पाटील यांचे राज्य सैनिकी शाळा कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांनी आभार व्यक्त केले आहे.