एज्युकेशन इंडिया तर्फे टायगर किड्स इंटरनॅशनल स्कूलला बेस्ट प्री स्कूल अवॉर्ड प्रदान

पारोळा (प्रतिनिधी) येथील टायगर किड्स इंटरनॅशनल स्कूलला एज्युकेशन इंडिया या संस्थेतर्फे बेस्ट प्री स्कूल इन स्मॉल टाउन अवॉर्ड प्रदान करण्यात आला. हा कार्यक्रम गुजरात राज्यातील अहमदाबाद शहरात संपन्न झाला. यावेळी टायगर किड्स इंटरनॅशनल स्कूलचे अध्यक्ष रवींद्र पाटील आणि संचालिका सौ रूपाली पाटील उपस्थित होते.या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून सृजन पाल सिंग माजी सल्लागार डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम, डॉक्टर मनजीत सिंग संस्थापक एज्युकेशन इंडिया, डॉ.आलोक कुमार सिन्हा सल्लागार इंडिगो ग्लोबल स्कूल, डॉ. राणी पी.एल. प्राध्यापिका इन्स्टिट्यूट ऑफ हायर लर्निंग अंतापुर हे उपस्थित होते.
आपले मनोगत व्यक्त करताना अध्यक्ष रवींद्र पाटील यांनी मान्यवरांचे आभार व्यक्त केले आणि भविष्यात चांगलं काम करण्याची प्रेरणा मिळाली असे प्रतिपादन केले.