पारोळा येथे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांची आज ऐतिहासिक सभा; ११५ कोटींच्या कामांचे भूमिपूजन

0

आमदार चिमणराव पाटील यांच्या प्रयत्नांमुळे विविध विकास कामांना मंजुरी
पारोळा (प्रतिनिधी) शहराचा अनेक वर्षांपासून प्रलंबित पाणीपुरवठ्याचा विषय आमदार चिमणराव पाटील यांच्या पाठपुराव्यामुळे मार्गी लागला आहे . शहरवासीयांसाठी अत्यावश्यक असलेली पाणीपुरवठा योजना मंजूर करून प्रत्यक्ष कामाचा शुभारंभ आज १६ रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते होत आहे . शहराच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने तब्बल ११५ कोटीच्या विविध विकासकामांचे भूमिपूजनही मुख्यमंत्री शिंदे यांच्याहस्ते होत आहे.यावेळी पालकमंत्री गुलाबराव पाटील, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, बंदरे व खनिज कर्म मंत्री दादा भुसे, शिक्षणमंत्री दीपक केसरकर, राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराजे देसाई,आदिवासी विकास मंत्री डॉ.विजयकुमार गावित,उद्योग मंत्री उदय सामंत, कृषी मंत्री अब्दुल सत्तार,रोजगार हमी व फलोत्पादन मंत्री संदीपानराव भुमरे,आरोग्यमंत्री तानाजी सावंत,अन्न व औषध मंत्री संजय राठोड,खासदार उन्मेश पाटील, खासदार रक्षा खडसे, पाचो-याचे आमदार किशोर पाटील,आमदार संजय सावकारे,आमदार राजूमामा भोळे,आमदार मंगेश चव्हाण,आमदार चंद्रकांत पाटील,विधानपरिषदेचे आमदार चंदूलाल पटेल,आमदार लता सोनवणे यांच्यासह मतदारसंघातील विविध पदाधिकारी व शासकीय अधिकारी उपस्थित राहणार आहेत.आमदार चिमणराव पाटील यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे तब्बल ११५ कोटीच्या विकासकामांचे भूमिपूजन होत आहे.
पारोळा शहर पाणीपुरवठा योजना,एरंडोल शहर पाणीपुरवठा योजना,पारोळा नगरपरिषद हद्दीतील अत्याधुनिक सोयी सुविधा युक्त नाट्यगृह बांधकाम,पारोळा नगरपरिषद येथील गट नंबर २४१ /१ येथे जलतरण तलाव इमारतीसह बांधकाम,पारोळा येथील जागेत ” विकली मार्केट (आठवडे बाजार),फिश व मटन मार्केट विकसित करणे,पारोळा येथील दामू अण्णा नगर,डीडी नगर भाग २,तांबे नगर या ओपन स्पेसमधील बगीचा विकास,पारोळा येथील गट नंबर १३८ या ओपन स्पेसमध्ये बगीचा विकसित करणे,धरणगाव चौफुली चौक व परिसराचे तसेच झपाट भवानी चौकाचे सुशोभीकरण,कजगाव नाका ते पालिकाहद्दीपर्यंत,उंदीरखेडा नाका ते पालिका हद्दीपर्यंत, चोरवड फाटा ते पालिका हद्दीपर्यंत,अमळनेर रोड ते पालिका हद्दीपर्यंत,धरणगाव रोड ते पालिका हद्दीपर्यंत विद्युतीकरण,आझाद चौकाचे सुशोभीकरण,न्यू बालाजी नगर येथे ओपन स्पेसमध्ये सुशोभीकरण,छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसराचे सुशोभीकरण,राणी लक्ष्मीबाई पुतळा व परिसराचे सुशोभीकरण,डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा व परिसराचे सुशोभीकरण,मोठा महादेव चौकाचे सुशोभीकरण,शनी मंदिर भागातील तुकाराम महाराज चौकाचे सुशोभीकरण,गट क्रमांक ७६८ या ओपन स्पेसमध्ये गार्डन जिम व वाचनालय विकसित करणे अशा विविध विकासकामांचे भूमिपूजन होत आहे.
विविध विकासकामांच्या भूमिपूजनप्रसंगी मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांची जाहीर सभा एन. ई. एस. हायस्कूल पटांगणावर सायंकाळी ६ वाजेला मान्यवरांच्या उपस्थित मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची जाहीर सभा होणार आहे. भूमिपूजन सोहळ्यासह जाहीर सभेस नागरिकांनी उपस्थिती द्यावी, असे आवाहन आमदार चिमणराव पाटील व जिल्हा बँकेचे संचालक तथा कृषी उत्पन्न बाजार समितीचे मा.सभापती अमोल पाटील यांनी केले आहे.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!