कुसुमबाई भदाणे-पाटील यांचे निधन;19 रोजी अत्यंयात्रा

अमळनेर (प्रतिनिधी) मंगरूळ (ता.अमळनेर) येथील रहिवासी कुसुमबाई भिमराव भदाणे-पाटील (वय ७३) यांचे आज सकाळी १० वाजून ३ मिनिटांनी वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांची अंत्ययात्रा उद्या (ता.१९) सकाळी ९ वाजता मंगरूळ येथील राहत्या घरापासून निघणार आहे. आदर्श शेतकरी भिमराव भदाणे-पाटील यांच्या पत्नी तर दैनिक पुण्यनगरीचे संपादक विकास भदाणे-पाटील यांच्या आई होत.