राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त शिक्षक अनिल पाटील यांचा आत्महृदयी सत्कार!

अमळनेर (प्रतिनिधी) येथील शिवशाही फाउंडेशन व राज्य सैनिकी शाळा कृती समिती तर्फे शनिवारी (ता.२५) राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त शिक्षक अनिल पाटील यांचा आत्महृदयी सत्कार करण्यात आला.
येथील विजयनाना पाटील आर्मी स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजचे इंग्रजी शिक्षक अनिल नथ्थू पाटील यांना राजनंदिनी बहुुद्देशिय संस्था,जळगाव यांच्या तर्फे नुकतेच “राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार”ने सन्मानित करण्यात आले. या पार्श्वभूमीवर शिवशाही फाउंडेशन (अमळनेर) व राज्य सैनिकी शाळा कृती समिती तर्फे हा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाला शिवशाही फाउंडेशन चे संस्थापक अध्यक्ष तथा प्रजाराज्य न्यूज चे संपादक जयेशकुमार काटे, राज्य सैनिकी शाळा कृती समितीचे शिलेदार टी.के.पावरा, उपक्रमशील गणित शिक्षक शिवाजी पाटील, टीडीएफचे कार्याध्यक्ष तथा “दै. सकाळ”चे तालुका बातमीदार उमेश काटे, केंद्रप्रमुख भटु पाटील आदी उपस्थित होते.
सत्काराला उत्तर देताना अनिल पाटील म्हणाले की, हा पुरस्कार माझ्या जीवनातील सर्वोच्च आनंदाचा क्षण आहे. या पुरस्काराने आता अध्यापनातील जबाबदारी अधिक वाढली आहे. भविष्यात विद्यार्थ्यांमध्ये आपल्या विषयाची गोडी निर्माण करून भविष्यात ते कसे उच्च पदांवर कार्यरत होतील यासाठी नेहमीच प्रयत्नशील राहणार आहे.