मनसेच्या मागणीला यश;भुयारी गटारीचे काम सुरू

अमळनेर (प्रतिनिधी) येथील भुयारी गटार व रस्त्यांचे काम पूर्ण करा असे निवेदन मनसेतर्फे मुख्य अधिकाऱ्यांना देण्यात आले होते. निवेदनात म्हटले होते की, अंमळनेर शहरात नगरपरिषद अमृत योजना अंतर्गत सुरू असलेल्या भुयारी गटारीच्या कामांमुळे चांगले रस्ते खोदून खराब झाले होते त्यामुळे नागरिकांचे अत्यंत हाल होत होते पावसाळ्यात नागरिकांना रहदारीसाठी किंवा वाहन चालकांना तसेच पादचाऱ्यांना मोठा त्रास सहन करावा लागत होता, त्यामुळे पालिका प्रशासनाने राजकीय विषय न आणता भुयारी गटारी व रस्त्याचे काम पावसाळ्यापूर्वी पूर्ण करावे पालिका प्रशासनाने शासनाकडे पाठपुरावा करून रस्त्याचे तसेच भुयारी गटारी चे काम लवकर पूर्ण करून नागरिकांचे हाल थांबावेत अशी मागणी मनसेतर्फे करण्यात आली होती. नगरपालिका प्रशासनाने अमृत योजनेचे अंतर्गत सुरू असलेल्या भुयारी गटारीचे काम सुरू केलं व मनसेच्या मागणीला यश आले आहे, त्यामुळे नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.