भारतीय जैन संघटनेच्या विभागीय उपाध्यक्षपदी लतीश जैन यांची निवड

चोपडा ( प्रतिनिधी) दि.५ रोजी भारतीय जैन संघटनेचे राज्य अध्यक्ष नंदूभाऊ साखला व राज्य सचिव दीपक भाऊ चोपडा यांच्या खानदेश दौरा होता यानिमित्ताने स्वाध्याय भवन,(जळगाव) येथे घेण्यात आलेल्या जिल्हा बैठकित चोपडा येथील लतीश भवरलाल जैन यांची (जळगाव,धुळे,नंदुरबार या तीन जिल्ह्याचा ) विभागीय उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली यावेळी जळगावचे विनय पारख,राज्य कार्यकारणी सद्स्य चंद्रकांत डागा, मुक्ताईनगरचे जेष्ठ कार्यकर्ते रमनलालबागरेचा, अमळनेरचे माजी जिल्हाध्यक्ष विनोद जैन, कांतीलाल जैन चोपडा अध्यक्ष निर्मल बोरा,सचिव गौरव कोचर,कोषाध्यक्ष अभय ब्रम्हेचा ,दर्शन देशलहरा,आदी उपस्थित होते लतीश जैन यांचा शाल श्रीफळ देवून सत्कार करण्यात आला यावेळी त्यांना अनेकांनी शुभेच्छा दिल्या.