ॲड.ललिता पाटील इंटरनॅशनल स्कूल येथे प्रदूषण विरहित गणेशोत्सव

0

अमळनेर (प्रतिनिधी)ॲड. ललिता पाटील इंटरनॅशनल स्कूल येथे गणेशोत्सव प्रदूषण विरहित साजरा करण्यात येत आहे. गणेशोत्सव हा पर्यावरणाचे संवर्धन करणारा असावा यासाठी संस्थेच्या अध्यक्षा ॲड ललिता पाटील यांच्या मार्गदर्शनाने शाडू मातीचे गणपती बनवून त्यांची स्थापना करण्यात आली. यावेळी विद्यार्थ्यांना शाडू माती पासून गणपती बनवण्याचे मोलाचे प्रशिक्षण शिक्षक वर्गाकडून देण्यात आले . गेल्या आठ वर्षापासून प्रदूषण विरहित गणेशोत्सव साजरा करण्यासाठी संस्थेच्या वतीने या उपक्रमाचे आयोजन केले जात असते. विद्यार्थ्यांचा यात सहभाग घेऊन त्यांच्या कलागुणांना वाव मिळावा हा संस्थेचा प्रयत्न असतो. विद्यार्थी यात आनंदाने सहभागी होतात.
या कालावधीतच वृक्षारोपण, विविध स्पर्धा, स्वच्छता मोहीम यासारखे उपक्रम राबवीत पर्यावरण संवर्धन करण्याच्या दृष्टीने विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती केली जात असते.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!