लोकांना मामा करणारा मनोहर मामाच,झाला मामा!

बारामती (वृत्तसंस्था) सध्याच्या २१ व्या शतकात आधुनिक युग चालू आहे. या आधुनिक युगामध्ये मोठ्या प्रमाणावर लोकांचे विचार पण आधुनिक आहेत. पण काही वेळेला शिक्षित आणि नोकरी धंद्यावाली माणसे बुवाबाजी आणि अंधश्रधेच्या दिखाव्याला भुलत असल्याचे पण दिसून आले आहे. मनोहर मामा नावाच्या भोंदू बाबाला पण काही दिवसांपूर्वी पोलिसांनी अटक केली आहे.

त्या मनोहर मामाचे अनेक कारनामे पोलिसांनी उघड केले आहेत. मनोहर मामा भक्ताला त्याच्या कुटुंबाबद्दल माहिती सांगत असायचा. ती माहिती तो कोठून कशी मिळवत असे याबद्दल पत्रकार परिषदेत अधिक माहिती देण्यात आली आहे. मनोहर मामा मोबाईल मधील अँप आणि सरकारच्या वेबसाईटच्या माध्यमातून भक्तांच्या घरच्यांबद्दल अधिक माहिती देत असायचा.
मनोहर मामा खाजगी माहिती कशा पद्धतीने गोळा करत असायचा हे पण एक मोठे गूढच आहे. त्यामागचा तपास जर लागला तर बऱ्याच गोष्टींचा उलगडा होण्यास मदत होणार आहे. सरकारच्या वेबसाइटवरून लाखो लोकांची माहिती लीक करण्यात मनोहर मामाच्या टोळीचा समावेश आहे. मनोहर मामाने माहिती लीक करून लोकांना बडण्याचं काम केलेलं आहे.
सरकारी अँप माय रेशन नावाच्या अँपमध्ये एका व्यक्तीचा जरी आधार कार्ड नंबर टाकला तरी सर्वांचे नाव त्यात येतात. त्यात नाव आल्यावर घरातल्या सर्वांची माहिती कळत असल्याचे पण दिसून आले आहे. फक्त कुटुंबातील एका व्यक्तीचे जरी नाव टाकले तरी बाकी सर्वांची माहिती येत असल्याचे पण दिसून आले आहे.
