प्रजाराज्य न्यूज :हेडलाईन्स!

19 सप्टेंबर 2021
▶️ करमा विसर्जनासाठी गेलेल्या सात मुलींचा तळ्यात बुडून मृत्यू. मृतांमध्ये तीन सख्या बहिणींसह त्यांच्या चार मैत्रिणींचाही समावेश. झारखंडच्या लातेहार जिल्ह्यात भीषण दुर्घटना..
▶️ साहित्य क्षेत्रातील प्रतिष्ठित साहित्य अकादमी पुरस्कार-2021 ची घोषणा.. सोनाली नवांगुळ आणि मंजुषा कुलकर्णी यांना साहित्य अकादमीचा पुरस्कार जाहीर..
▶️ नवी दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठाच्या विद्यार्थी संघटनेचा माजी अध्यक्ष कन्हैया कुमार आणि गुजरातमधील अपक्ष आमदार जिग्नेश मेवानी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार.
▶️ कोरोनामुळे स्थगित झालेल्या आयपीएलच्या सामन्यांची रणधुमाळी आजपासून (ता. 19) पुन्हा सुरू. चाहत्यांना स्टेडियममध्ये उपस्थित राहता येणार. सीएसके व मुंबई इंडियन्समध्ये सामना..
▶️ आगामी टी20 विश्वचषकानंतर टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्री यांच्या जागी बीसीसीआयकडून अनिल कुंबळे व व्हीव्हीएस लक्ष्मण यांच्या नावाचा विचार.
▶️ कॉंग्रेसने नवज्योत सिद्धू यांना पंजाबचे मुख्यमंत्री बनविल्यास मी त्याचा विरोध करणार.. पाकिस्तानचे पंतप्रधान, जनरल बजावाशी त्यांची मैत्री.. राजीनाम्यानंतर कॅप्टन अमरिंदर सिंह आक्रमक ..
▶️ राज्यात मराठवाड्यासह मुंबईत मुसळधार पावसाची शक्यता. बंगालच्या उपसागरामध्ये वादळासारखी हालचाल. महाराष्ट्रात 20 सप्टेंबरपासून पावसाचा अंदाज..
▶️ कंगना राणौतचा पुन्हा एकदा ठाकरे सरकारवर निशाणा.. मुंबईत चित्रपटगृह न उघडल्याने महाराष्ट्र सरकारवर जोरदार टीकास्त्र.. कोरोना केवळ महाराष्ट्रातील थिएटर्समध्येच पसरतो का..?
▶️ अहमदनगरच्या हिवरे बाजारने करुन दाखवलं! कोरोना संकटातही शाळा सुरु, 90 दिवस पू्र्ण.. गाव कोरोनामुक्त झाल्यानंतर ग्रामसभेत 15 जूनपासून शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला होता.