गुजरात सरकारने नवीन नियमांसह केले नवीन अनलॉक

सूरत/ प्रतिनिधी / निवृत्ती पाटील
गुजरात सरकारने नवीन नियमांसह नवीन अनलॉक केले आहे ,या बाबतच्या कोअर कमिटीच्या बैठकीत घेतले. त्यामध्ये त्यांनी राज्यातील 36 शहरांमधील सर्व दुकाने, व्यावसायिक प्रतिष्ठान, लारी गॅला, शॉपिंग कॉम्प्लेक्स, हेअर कटिंग सलून, ब्युटी पार्लर, मार्केटींग यार्ड तसेच अन्य व्यावसायिक उपक्रम 4 जून रोजी सकाळी 9 ते संध्याकाळी 6 या वेळेत खुला राहण्यास परवानगी दिली. हॉटेल,भोजनालय यांना रात्री 10 पर्यंत डिलिव्हरी देखील करता येईल मुख्यमंत्र्यांनी राज्यातील 36 शहरांमध्ये रात्रीचे कर्फ्यू आणखी एका आठवड्यात वाढविण्याची घोषणा केली आहे. तर या 36 शहरांमध्ये 4 ते 11 जून या कालावधीत रात्री 9 ते सकाळी 6 या वेळेत कर्फ्यू लागू करावा लागणार आहे, दुकाने सकाळी 9 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत खुली ठेवण्यास परवानगी देण्यात येणार आहे.