मासिक पाळी, अपवित्र कशी ?

ती….तो….आणि तिची मासिक पाळी..
सगळ्या विश्वाची निर्मिती कुणी
केली..?
तर उत्तर येतं…”देवाने…!”
मग पुरुष कुणी निर्माण केले..?
देवाने…
स्त्रीया कुणी निर्माण केल्या…?
देवाने…!
मग स्त्री ची मासिक पाळी
कुणी निर्माण केली…?
देवानेच ना…?
जर देवाला मासिक पाळी आवडत नाही तर
मग त्याने ती स्त्रीला दिलीच
कशाला..?
मासिक पाळी म्हणजे काय…?
गर्भधारणा न झाल्याने
शरीरातून बाहेर टाकली जाणारी गर्भाची अंतत्वचा…!
गर्भधारणा झाली नाही तर दर महिन्याला
5 दिवस ही क्रिया घडते की जिला आपन
मासिक पाळी म्हणतो..!
आता मासिक पाळीत जे रक्त बाहेर पडतं ते अशुद्ध असतं, असा एक गैरसमज आहे किंवा या काळात स्रिया निगेटिव एनर्जी बाहेर टाकत
असतात… असा एक फालतू गैरसमज आहे.
खरं तर, दर महिन्याला गर्भाशय तयार होतं, आणि गर्भधारणा न
झाल्याने ते बाहेर टाकलं जातं.. मग ते अशुद्ध कसे असेल…?
उलट ज्या ठिकाणी बाळाचं 9 महीने 9
दिवस संगोपन होणारे त्या जागी शरीरातील चांगलच रक्त असेल ना…?
की अशुद्ध असेल..?
झाडाला फूल येतं मग त्या फुलाच फळ होतं…
आपण झाडाची फुले देवाला घालतो.. कारण देवाला फुले आवडतात..
बाईला मासिक पाळी येते.. आणि म्हणून गर्भधारणा होते.
म्हणजेच मासिक पाळी जर ‘फूल’ असेल तर गर्भधारणा हे ‘फळ’ झालं..!
देवाला झाडाचं फूल चालतं मग मासिक पाळी का चालत
नाही..?
मासिक पाळी आलेल्या बाईचा साधा स्पर्श चालत नाही..?
कधी कधी ती घरात धार्मिक कार्यक्रम आहे म्हणून, गोळ्या खाऊन पाळी पुढे ढकलते..
की जे सरळ-सरळ निसर्गाच्या विरोधात जाणं आहे. आणि याचा त्रास तिलाच होतो. मुळात प्रॉब्लेम जो आहे ना तो पुरुषी मानसिकतेत आहे..
तिच्यावर हक्क गाजवला पाहिजे या पुरुषी अहंकाराचा
आहे, आणि त्या पेक्षा सर्वात जास्त स्वतः स्रिया मानसिक गुलामगिरीत आहेत.
या गोष्टींकडे आपण कधी उघड्या आणि
वैज्ञानिक दृष्टिकोनाने पाहिलेलच नाहिये..!
मासिक पाळी ही बाईची
कमजोरी नसून निसर्गाने बाईला दिलेली ही जास्तीची शक्ती आहे की जी
तिला आई बनण्याचे सुख बहाल करते, आणि कोण आहेत ही फालतू जनावरं की
जी सांगतात ‘ बाईला मासिक पाळीत मंदिरात
प्रवेश नाही म्हणून..?’
बाईच गर्भाशय म्हणजे वाटलं काय तुम्हाला..? कोण
ही जनावरं की जी सांगतात
10-10 मुलं जन्माला घाला..!
अरे एका बाळंतपनात बाईची काय हालत होते ना ते आधी ‘तुमच्या आईला’ जाऊन विचारा…
पोटाच्या बेंबीपासून ते छातीपर्यन्त 9 महीने 9 दिवस बाईने आणखी एक जीव वाढवायचा.. त्याला जन्म द्यायचा. त्याचे संगोपन करायचं..
आणि एवढं सगळं करुण मुलाच्या नावात आईचा साधा
उल्लेखही नाही..!
मुळात गडबड आहे ना ती इथल्या सडक्या मेंदूत आहे..!
प्रश्न आहे तो बाईला केवळ भोगवस्तु म्हणून पाहणाऱ्या इथल्या घाणेरड्या पुरुषी मानसिकतेचा…! आणि जास्त गडबड आहे ती “तिच्यातच” आहे,
कारण ती स्वतालाच समजून घेत नाही.. ती कुटुंबाच्या भल्यातच
इतकी गुंगते की तीला या गोष्टींवर साधा विचार करायलाही फुरसत
नाही… हे सगळं चालुये…याचं कारण “ती” गप्प आहे. ती विद्रोह करत नाही, ती मुकाट्यांन सहन करते…
गरज आहे तीला विद्रोह करण्याची…. इथल्या दांभिक वास्तवाविरुद्ध, इथल्या सडक्या पुरुषी मानसिकतेविरुद्ध… इथल्या धर्माच्या अवडंबाविरुद्ध आणि गरज आहे त्याला.. तीला समजून घेण्याची…
तिच्या मासिक पाळीला समजून घेण्याची…
तिच्या भावभावनांना समजून घेण्याची, आणि या विद्रोहात तितक्याच हळुवारपने ‘तीला’ मदत
करण्याची…!
मित्रांनो…
विचार तर कराल…?
मासिक पाळी ला विटाळ समजणारे लोक स्वताच्या मुलीला मासिक पाळी येत नसेल तर लगेच डॉ. कडे जातात. मुलाचे लग्न करताना मासिक पाळी न येणा-या मुलीला आपली सुन म्हणुन
स्वीकारतील का ?
नाही ना.. ?
लेखक / कवी.
अंकुश लालचंद कुमावत.
(संस्थापक)
अंकुश भाऊ कुमावत युवा मंच महाराष्ट्र.
