कल्याणी सुर्यवंशीचे एमबीबीएस परीक्षेत यश!

अमळनेर (प्रतिनिधी) येथील रहिवासी तथा औरंगाबाद येथील एम.जी.एम वैद्यकीय महाविद्यालयाची विद्यार्थिनी कल्याणी सुरेंद्र सुर्यवंशी हिने “एमबीबीएस” ची वैद्यकीय पदवी प्रथम श्रेणीत विशेष प्रविण्यासह प्राप्त केली. त्या आर्डी- आनोरे (ता अमळनेर) येथील मूळ रहिवासी आहेत. डॉ. कल्याणी ह्या गावाच्या तिसऱ्या महिला एमबीबीएस डॉक्टर ठरल्या. त्यांच्या या यशाने गावाच्या शिरपेचात एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. डॉ कल्याणी ही पिंपळे हायस्कूलचे मुख्याध्यापक सुरेंद्र सुर्यवंशी व डी आर कन्या शाळेच्या माध्यमिक शिक्षिका सिमा सुर्यवंशी यांची सुकन्या आहे. त्यांच्या यशाबद्दल त्यांचे व पालकांचे कौतुक होत आहे.