शुक्रवार, 7 मे 2021

▶️ हवेतून ऑक्सिजन निर्मितीचे 38 पीएसए प्रकल्प राज्यात कार्यान्वित; दिवसाला 53 मेट्रीक टन ऑक्सिजनची निर्मिती – आरोग्यमंत्री राजेश टोपे

▶️ महाराष्ट्रात 6,39,075 सक्रिय कोरोनाग्रस्त रुग्ण तर 42,27,940 रुग्ण कोरोनामुक्त; एकूण 73,515 रुग्णांचा मृत्यू

▶️ आरोग्य विभागाच्या 100 टक्के पदभरतीला मान्यता, नर्स, तंत्रज्ञ, वॉर्ड बॉय, वाहनचालक, शिपाई अशी 16 हजार पदे तातडीने भरणार; आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहीती

▶️ एमजी मोटर्सकडून आपली ऑटोनॉमस एसयुवी एमजी ग्लोस्टरच्या किंमतीत वाढ, ही देशातील पहिलीच सेल्फ ड्रायव्हिंग कार

▶️ भारतात 36,44,436 सक्रिय कोरोनाग्रस्त रुग्ण तर 1,75,97,410 रुग्ण कोरोनामुक्त; एकूण 2,34,071 रुग्णांचा मृत्यू

▶️ बीड: मराठा समाज पुन्हा एकदा आक्रमक आंदोलन करणार, लॉकडाऊननंतर राज्यातील पहिला आक्रमक मोर्चा बीडमध्ये निघणार

▶️ ‘राधे’चा निर्णय: सलमान खान चित्रपटाच्या कमाईचा एक भाग गरजूंच्या मदतीसाठी करणार खर्च, खरेदी करणार ऑक्सिजन सिलिंडर्स, कन्संट्रेटर्स आणि व्हेंटिलेटर्स

▶️ लहान मुलांच्या जगातील पहिल्या व्हॅक्सिनला कॅनडात मंजुरी; अमेरिकेत फायझरच्या व्हॅक्सिनवर पुढील आठवड्यात येणार निर्णय

▶️ सर्वात आधी विदेशी खेळाडूंना पोहचवण्यात यावे, जोपर्यंत सर्व सहकारी सुखरुप घरी पोहचत नाही, तोपर्यंत मी चैन्नई संघाला सोडून हॉटेलमधून जाणार नाही – महेंद्रसिंह धोनी

▶️ गोव्यात आता 10 मे पर्यंत शूटिंगला बंदी,  ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’, ‘अग्गंबाई सूनबाई’सह या मराठी आणि हिंदी मालिकांच्या शूटिंगला पुन्हा लागणार ब्रेक

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!