दातृत्व; ग.स.सोसायटीने 1111111 रु.ची मदतनिधी मुख्यमंत्र्यांकडे केली सुपूर्द!

जळगाव (प्रतिनिधी) येथील जिल्हा सरकारी नोकरांची सहकारी पतपेढी अर्थात ग.स.सोसायटीतर्फे कोरोनाच्या प्रतिकारासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी जाहिर केलेला 11 लाख 11 हजार 111 रूपयांच्या मदत निधीचा धनादेश आज राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचेकडे सुपूर्द केला.
गेल्या महिन्याच्या अखेरीस ग. स. सोसायटी, जळगावतर्फे कोरोनाच्या प्रतिकारासाठी जिल्हा उपनिबंधक संतोष बिडवई, सोसायटीचे विजयसिंह गवळी, प्रशांत विरकर, एस. आर. पाटील, भाऊसाहेब महाले, एन. एस. पाटील, हेमंत नारखेडे आदिंच्या उपस्थितीत मुख्यमंत्री सहाय्यता निधीचा धनादेश पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांचेकडे सुपूर्द केला होता.
पालकमंत्री ना. पाटील यांनी आज हा धनादेश मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे सुपूर्द केला. याप्रसंगी खासदार संजय राऊत, खासदार अरविंद सावंत, परिवहन मंत्री ॲड अनिल परब आदि उपस्थित होते.