चोपड्याच्या कला शिक्षकाची OMG BOOK OF RECORD मध्ये नोंद!

चोपडा (प्रतिनिधी) BOOK OF RECORD हि रजिस्टर विथ गव्हर्मेंट ऑफ इंडिया विथ RNl No. MAH HIN 064B5/13 -1-2007 संस्था जी विविध क्षेत्रात रेकॉर्ड ब्रेक करणाऱ्या व्यक्तींची नोंद ठेवत असते. या संस्थेचे डॉक्टर दिनेश गुप्ता Member of parliament of world constitution Association USA, CEO and chif Editor of OMG, Member of Quality council of India यांनी चोपडा येथील विवेकानंद विद्यालयाचे कलाशिक्षक श्री राकेश राजकुमार विसपुते यांच्या भित्ति-चित्रांची OMG BOOK OF RECORD ( National Record) मध्ये नोंद करून घेतली.

सविस्तर वृत्त पुढील प्रमाणे संपूर्ण भारतात covid-19 च्या पार्श्वभूमीवर लॉक-डाऊन असताना स्वतःच्या शाळेत ( विवेकानंद विद्यालय यावल रोड चोपडा तालुका चोपडा जिल्हा जळगाव ) या ठिकाणी 4×6 फुटाच्या भिंतीवर “हम स्कूल के बच्चे खुद की रक्षा खुद करेंगे ” या आशयाचे समाज प्रबोधन करणारे भित्तीचित्र अवघ्या 4 तासात साकारून असे चित्र काढणारी भारतातील एकमेव व पहिली शाळा म्हणून मान मिळवित रेकॉर्ड केला. या आगळ्या – वेगळ्या प्रयोगाची दखल OMG BOOK OF RECORD (National Record ) ने घेतली व कलाशिक्षक श्री.राकेश राजकुमार विसपुते यांना OMG BOOK OF RECORD (National Record ) बुक मध्ये नाव नोंदवित,स्मृतिचिन्ह,मेडल,अभिनंदन पत्र व प्रमाणपत्र देऊन सन्मानित केले आहे. त्यांच्या यशाचे सर्वत्र अभिनंदन व कौतुक होत आहे.