ॲड.ललिता पाटील इंटरनॅशनल स्कुलने शालेय शुल्कात आर्थिक सुट देत जपली सामाजिक बांधिलकी!

0

▶️ लॉकडाऊन मधेही शैक्षणिक वाटचाल यशस्वीपणे सुरू!
अमळनेर (प्रतिनिधी) येथील ॲड ललिता पाटील इंटरनॅशनल स्कुल ची लाॅकडाऊन असुनही शैक्षणिक वाटचाल यशस्वीपणे सुरु आहे.संपूर्ण जगासह भारतात कोरोना विषाणू पासुन नागरीकांचा बचाव व्हावा व संसर्गाची साखळी तुटली पाहीजे यासाठी विविध निर्बंध आहेत त्यातील एक निर्बंध म्हणजे गेल्या एका वर्षांपासुन जास्त काळ शाळा बंद आहे.शाळा जरी बंद असल्या तरी ऑनलाईन शिक्षणाची गंगा यशस्वीपणे अखंड सुरु ठेवत ॲड.ललिता पाटील इंटरनॅशनल स्कुलने एक आदर्श निर्माण केलेला आहे.
शाळा बंद असुनही विविध ॲप्लिकेशन च्या तसेच ऑनलाईन लाईव्ह क्लासेस च्या माध्यमातुन संस्थेने विद्यार्थ्यांना वर्षभरात दर्जेदार सी.बी.एस.ई माध्यमाचे शिक्षण दिले.ऑनलाईन पद्धतीने मिळणारे शिक्षण गुणवत्तापूर्ण व खेळीमेळीच्या वातावरणात मिळाल्याने विद्यार्थ्यांमध्ये चैतन्य निर्माण होऊन पालकांचाही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला व ऑनलाईन शिक्षणात विद्यार्थ्यांची रुची वाढीस लागुन ऑनलाईन शिक्षणाची नकारात्मकता संपुष्टात आली.राष्ट्रीय सण किंवा सांस्कृतिक कार्यक्रम ऑनलाईन पद्धतीने साजरा करत विद्यार्थ्यांचे सामाजिक व राष्ट्रीय भान संस्थेने तेवत ठेवले आहे.यासाठी प्राचार्य व सर्व शिक्षक वृंद वेळोवेळी परीश्रम घेतात.
या संपूर्ण शैक्षणिक वर्षात सुयोग्य नियोजनातुन ऑनलाईन परीक्षा घेण्यात आल्या तसेच त्या परीक्षांचा निकालही ऑनलाईन पद्धतीने लावत निकालाच्या पीडीएफ फाईल्स प्रत्येक विद्यार्थ्यांच्या व्हाॅटस ॲपवर पाठविण्यात आल्या.ऑनलाईन शिक्षणाविषयीचा न्यूनगंड बाजुला सारत सर्व विद्यार्थ्यांना शिक्षणाचे कार्य निरंतर सुरु ठेवले.सामान्य कुटुंब कोरोना व लाॅकडाऊन मुळे आर्थिक समस्यांना सामोरे जात असताना संस्थेच्या अध्यक्षा ॲड.ललिता पाटील,सचिव प्रा शाम पाटील,संचालक पराग पाटील यांच्या वतीने प्रत्येक विद्यार्थ्यांला शालेय शुल्कात आर्थिक सुट देऊन सामाजिक बांधिलकी जपली आहे.याबद्दल सर्व पालकांनी ॲड.ललिता पाटील इंटरनॅशनल स्कुल विषयी समाधानकारक प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!