फाजिल आत्मविश्वासाने विनाकारण फिरू नका;बॉडीबिल्डरचा कोरोनाने मृत्यु!

मुंबई (वृत्तसंस्था) देशात कोरोनाने थैमान घातले आहे. रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. गेल्या काही दिवसांपासून दररोज तीन लाखांहून अधिक रुग्ण आढळून येत असल्याने प्रशासनाची चिंता वाढली आहे. विविध राज्यात कोरोनामुळे मृत्यू होण्याचे प्रमाण वाढले आहे.सर्वसामान्य नागरिकांसह,अनेक नेते,खेळाडू,कलाकार कोरोनाच्या विळख्यात अडकून मृत्युमुखी पडत आहेत.
यातच आता बॉडीबिल्डिंग क्षेत्रातील सर्वोच्च किताब जिंकणारा मराठमोळा बॉडीबिल्डर जगदीश लाड याचं अवघ्या 34 व्या वर्षी निधन झालं. बडोद्यात त्याने अखेरचा श्वास घेतला.जगदीश यांच्या निधनानंतर गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी एक फेसबुक पोस्ट लिहिली असून कोरोनाच्या काळात जनतेला काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.
▶️ जितेंद्र आव्हाड यांची फेसबुक केले आवाहन
मिस्टर इंडियाचा किताब जिंकणारा मराठमोळा बॅाडीबिल्डर जगदीश लाड याचं वयाच्या अवघ्या 34व्या वर्षी कोरोनामुळे निधन.जगदीश लाडने अतिशय कमी वयात बॉडीबिल्डिंगला सुरुवात केली होती. त्याने नवी मुंबई महापौर श्रीचा किताब जिंकला होता. महाराष्ट्र श्रीमध्ये जवळपास ४ वेळा सुवर्णपदकाची कमाई केली होती. एवढंच नव्हे तर मिस्टर इंडिया स्पर्धेत २ वेळा सुवर्णपदकावर नाव कोरलं होतं. तसंच मुंबईत झालेल्या वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये त्याने कांस्य पदक मिळवलं होतं.
जगदीश लाड हा फीट असुन, रोगप्रतिकारक शक्ति चांगली असुन सुदधा कमी वयात आपल्याला सोडून गेला. त्यामुळे मला काही होणार नाही या भ्रमात राहू नका. काळजी घ्या विनाकारण बाहेर पडू नका. भावपूर्ण श्रद्धांजली
